कुडाळमध्ये क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये 
क्रिकेट स्पर्धा
कुडाळमध्ये क्रिकेट स्पर्धा

कुडाळमध्ये क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

कुडाळमध्ये
क्रिकेट स्पर्धा
कुडाळ ः येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळ, नेरूर आयोजित खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा ११ ते १५ जानेवारी या कालावधीत येथील तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील मैदानावर होणार आहे. विजेत्या संघास रोख १ लाख रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या संघास ५० हजार रुपये व आकर्षक चषक, तसेच इतर सांघिक व वैयक्तिक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत मर्यादित संघ घ्यावयाचे असल्याने आपल्या संघाची नावे ६ जानेवारीपर्यंत सुनील धुरी किंवा सचिन कांबळी यांच्याकडे संपर्क साधून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
..................
‘आपदा मित्र’चे
आज उद्‍घाटन
सिंधुदुर्गनगरी ः राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे उद्या (ता. १९) कुडाळ येथील आरएसएन हॉटेल येथे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‍घाटन सकाळी साडेअकराला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. १९ ते ३० पर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात २०० स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पैकी १०० जणांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण उद्यापासून सुरू होणार आहे.
--
‘मत्स्यगंधा’
आता विजेवर
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील मत्स्यगंधा एक्स्प्रेसही आता विजेवर धावणार आहे. मेंगलोर एलटीटी मत्स्यगंधा (१२६२०) १८ डिसेंबरपासून, एलटीटी-मेंगलोर (१२६१९) १९ डिसेंबरपासून विजेवर धावणार आहे. तसेच सिंधुदुर्गात थांबा असलेली थिरुवनंतपूरम-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशल (२२६३३) २१ डिसेंबरपासून तर हजरत निजामुद्दीन-थिरुवनंतपूरम (२२६३४) २३ डिसेंबरपासून विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
--
शूटिंग स्पर्धेत
गौरव द्वितीय
वेंगुर्ले ः सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत वेंगुर्ले हायस्कूलच्या गौरव आजगावकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शाळेचे क्रीडाशिक्षक केर्लेकर यांचे मार्गदर्शन व शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.