बांधकाम कामगारांची उद्या सिंधुदुर्गनगरी येथे बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगारांची उद्या
सिंधुदुर्गनगरी येथे बैठक
बांधकाम कामगारांची उद्या सिंधुदुर्गनगरी येथे बैठक

बांधकाम कामगारांची उद्या सिंधुदुर्गनगरी येथे बैठक

sakal_logo
By

69209
बाबल नांदोसकर

बांधकाम कामगारांची उद्या
सिंधुदुर्गनगरी येथे बैठक
कुडाळ, ता. १८ ः ओरोस येथे ३१ डिसेंबरला होणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्ग संघटनेच्या भव्य मेळाव्याबाबत नियोजनासंदर्भात कार्यकारिणी सदस्य, उपसमिती सदस्य व संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी (ता. २०) सकाळी दहाला संघटनेच्या श्री रवळनाथ मंदिर नजीक ओरोस येथील कार्यालयात आयोजित केली आहे. बैठकीत तळागाळातील कामगारांपर्यंत पोचून त्यांना संघटित करणे, बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांबाबत अन्यायकारक नियम व अर्ज मंजुरीची क्लिष्ट पद्धत यावर चर्चा करणे, २०१८ व २०१९ मधील शैक्षणिक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी शासन दरबारी निवेदन देणे व निर्णय घेण्यास भाग पाडणे, संघटनेची २०२३ साठी दिनदर्शिका प्रकाशित करणे आदींसह आयत्यावेळी उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यात बांधकाम कामगारांच्या हिताच्या दृष्टीने संघटितपणे निर्णय घेण्यात येणार आहेत. कार्यकारिणी, संघटना सदस्य, उपसमिती सदस्य तसेच संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, सचिव रवींद्र साळकर यांनी केले आहे.