Mon, Feb 6, 2023

सासोलीतील युवकाचे
लग्नाआधी ''मतदान''
सासोलीतील युवकाचे लग्नाआधी ''मतदान''
Published on : 18 December 2022, 11:21 am
69215
सासोली ः येथील युवकाने लग्नमंडपाआधी मतदान केंद्र गाठून हक्क बजावला.
सासोलीतील युवकाचे
लग्नाआधी मतदान
दोडामार्ग, ता. १८ ः जिल्ह्यात आज ग्रामपंचायत निवडणूक धामधूम असून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यपदांसाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सासोली येथील वैभव ठाकूर या युवकाने वेगळा आदर्श ठेवताना आज त्याचे ‘शुभ मंगल’ होत असताना ‘सावधान’ होण्याआधी भारतीय राज्य घटनेत पवित्र मानला जाणारा मतदानाचा हक्क सर्वप्रथम बजावला. वैभव या युवकाचे लग्न आज दुपारी लग्न होते; मात्र यातही वेळात वेळ काढून त्याने मतदानाला पहिली पसंती देऊन राष्ट्रसेवा बजावली.