चिपळूण-मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा
चिपळूण-मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

चिपळूण-मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat18p24.jpg- KOP22L69271 चिपळूण : पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी.
--------
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

डॉ. आंबेडकर स्मारक समिती ; पोलिसांना निवेदन

चिपळूण, ता. १८ ः उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांचा अपमान केल्याने त्यांच्यावर अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मिरजोळी डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने नुकतीच पोलिसांकडे केली आहे. हे निवेदन पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी स्वीकारले.
काही दिवसांपूर्वी पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर टीका केली. त्यांचे हे कृत्य चुकीचे असून त्यांच्यावर अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टिकेमुळे या देशातील प्रत्येक नागरिक चिडला आहे. यातूनच त्यांच्यावर मनोजभाऊ गरबडे यांनी काही दिवसांपूर्वी शाईफेक करून आपला संताप व्यक्त केला. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे गंभीर गुन्हेही तातडीने मागे घ्यावेत मागणी केली आहे. या वेळी समितीचे उपाध्यक्ष संतोष तांबे, अरविंद जाधव, सचिव राजेश जाधव, माजी अध्यक्ष मिलिंद सकपाळ, विनोद हिरे, संजय काबळे, नितीन जाधव, सुभाष पवार आदी उपस्थित होते.