रत्नागिरी-स्थलांतर प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-स्थलांतर प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारणार नाही
रत्नागिरी-स्थलांतर प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारणार नाही

रत्नागिरी-स्थलांतर प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारणार नाही

sakal_logo
By

स्थलांतर प्रमाणपत्राअभावी प्रवेश नाकारणार नाही

शिक्षण विभाग ः शासनाचा पालकांना दिलासा

रत्नागिरी, ता. १८ ः कोणत्याही माध्यमाच्या शाळेत पहिली ते दहावीच्या वर्गात अन्य शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) प्रवेश नाकारला जाणार नाही. याबाबतचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसला आहे.
कोरोना कालावधीत फी थांबल्याने खासगी शाळा विद्यार्थ्यांना दाखले देत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सरल प्रणालीवर शाळा दाखला फीमुळे ट्रान्स्फर करत नव्हत्या. टीसी सरलवरून सोडण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना होते. त्यामुळे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा कारभार मनमानी होता. सरल वर विद्यार्थी दुबार होते. मात्र, शाळा पालकांना जुमानत नव्हत्या. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून पालकांना दिलासा दिला आहे. जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या शासन निर्णयानुसार नगरपालिका, खासगी अनुदानित, कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालवण्यात येणार्‍या तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीच्या वर्गात, तसेच माध्यमिक शाळेत नववी व दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करत असेल, अशा विद्यार्थ्यांस शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) प्रवेश नाकारला जाणार नाही.
शाळा प्रवेशासाठी यापूर्वी रहिवाशी दाखला बंधनकारक होते. मात्र आता जन्म दाखला किंवा पुराव्यावर प्रवेश दिला जाणार आहे. जर जुन्या शाळेने दाखला सोडला नाही तर केंद्रप्रमुख सरलवरून ऑनलाईन दाखला सोडू शकणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानीत शाळेत प्रवेश सुलभरितीने मिळेल. २०२२ व २३ या शैक्षणिक वर्षांना जिल्हा परिषद व शासकीय शाळामध्ये विद्यार्थ्यांची वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच सरलवर एकही विद्यार्थी दुबार राहणार नाही.