
रत्नागिरी-रत्नागिरी-पावस पदयात्रेत स्वामीभक्तांचा अपूर्व उत्साह
फोटो ओळी
-rat१८p२२.jpg-KOP२२L६९२६९ पावस ः स्वामी स्वरुपानंद यांच्या समाधी मंदिराबाहेर पदयात्रा पोचताच भाविकांनी रिंगण घालून स्वामींचा जयजयकार केला.
(छाया ः अतुल बडे, रत्नागिरी)
----------
रत्नागिरी-पावस पदयात्रेत स्वामीभक्तांचा अपूर्व उत्साह
ओम राम कृष्ण हरी चा गजर ; मंदिराबाहेर झाले भक्तीचे रिंगण
रत्नागिरी, ता. १८ ः प. पू. स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सवानिमित्त रविवारी (ता. १८) सुमारे २० किमीची पदयात्रा काढण्यात आली. पहाटे साडेचार वाजता जयस्तंभ येथून अपूर्व उत्साहात पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेचे यंदाचे विसावे वर्ष असून उदंड प्रतिसाद मिळाला.
पदयात्रेत स्वामीभक्त ॐ राम कृष्ण हरि नामस्मरण करीत पहाटेच्या धुंद वातावरणात चालत निघाले.
आजची दिंडी म्हणजे चालण्याची स्पर्धा नव्हती. पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्वास किती खोलवर घेता येतो हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी आली. सकाळचे धुके, भाट्ये समुद्राची गाज, गुलाबी थंडी, पहाटेचे कुंद वातावरण, समधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी पाहून सारेजण आनंदित झाले.
दरमजल करीत सकाळी नऊ वाजता दिंडी पावस येथे पोहोचली. स्वामी मंदिरासमोर दिंडी आल्यावर भाविकांचा उत्साह शिगेला पोचला. भाविकांनी मंदिराबाहेरील चौकात रिंगण घातले. महिलांनी फेर धरून, फुगड्या घालून आनंद लुटला, अभंग सांगितले.
दिंडीत पुरुषांनी पांढरी टोपी घातली होती. वाटेत पाणी, चहाची व्यवस्था करण्यात आली होती. वारीचे यशस्वी आयोजन योग शिक्षक, उद्योजक, स्वामीभक्त अनंत आगाशे, राजन पटवर्धन आणि सर्व सहकाऱ्यांनी केले.