रत्नागिरी- पर्यटन वाढीसाठी जिल्ह्याला हजार कोटीचे पॅकेज द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- पर्यटन वाढीसाठी जिल्ह्याला हजार कोटीचे पॅकेज द्या
रत्नागिरी- पर्यटन वाढीसाठी जिल्ह्याला हजार कोटीचे पॅकेज द्या

रत्नागिरी- पर्यटन वाढीसाठी जिल्ह्याला हजार कोटीचे पॅकेज द्या

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१८p१५.jpg-KOP२२L६९१८९ रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्यटन वाढीकरिता पॅकेज मंजूर करण्याचे निवेदन देताना राजू भाटलेकर.


पर्यटन वाढीसाठी जिल्ह्याला
हजार कोटीचे पॅकेज द्या
राजू भाटलेकर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
रत्नागिरी, ता. १८ : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक हजार कोटींचे पॅकेज मंजूर करण्याबाबतचे निवेदन रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. श्री. शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे भाटलेकर यांनी त्यांची भेट घेऊन पर्यटनातून शाश्वत विकास शक्य असल्याने पॅकेज देण्याची मागणी केली.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर आहे. मोठ्या प्रमाणात देश-विदेशातून फार मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे कोकणातील अनेक तरुण पर्यटन व्यवसायाकडे वळत आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी अनेक ठिकाणी होम स्टे, कृषी पर्यटन, रेस्टॉरंट, मोठ मोठी हॉटेल उभारली आहेत. आपला रोजगार स्वतः निर्माण करत आहेत. पण येथे येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधांची कमी जाणवते. त्यामुळे पर्यटक नाराज होतात. गोव्यापेक्षाही अनेक सुंदर समुद्रकिनारे रत्नागिरीत आहेत. त्या परिसराचा विकास होणे गरजचे आहे. त्यासाठी किमान एक हजार कोटींचा निधी मिळणे आवश्यक आहे.
या परिसरात पार्किंग, लाईट, पाणी, स्वच्छतागृहे, चेजिंग रूम, समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी असणारे रस्ते रुंद करणे, समुद्र किनारे स्वच्छ ठेवणे व त्याचे मार्केटिंग करणे, समुद्रामध्ये बुडणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता जपणे व त्यासाठी उपाय योजना केल्या पाहिजेत. नद्या व खाडी यांचाही पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा. जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक मंदिरे असून पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचाही विकास व्हावा. त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून द्यावा.
----------
चौकट

गडकिल्ले, स्मारकांसाठी निधी
जिल्ह्यात अनेक गडकिल्ले आहेत. त्याची आता पडझड होत आहे, ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. तेथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. वि. दा. सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कवी केशवसुत अशा महापुरुष, क्रांतीकारकांची स्मारके आहेत. त्यांच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी भाटलेकर यांनी केली.