‘नशाबंदी’तर्फे काव्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नशाबंदी’तर्फे काव्य स्पर्धा
‘नशाबंदी’तर्फे काव्य स्पर्धा

‘नशाबंदी’तर्फे काव्य स्पर्धा

sakal_logo
By

‘नशाबंदी’तर्फे काव्य स्पर्धा
कणकवली ः नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने व्यसनमुक्ती काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंडळाच्यावतीने महाराष्ट्रभर व्यसनमुक्ती प्रसारासाठी पथनाट्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करून त्याद्वारे व्यसनांची दाहकता मांडली जाते. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी व्यसनाधीनतेचे वास्तव व त्यावरील उपाय काव्यातून प्रकट करावेत. कविता ३१ पर्यंत स्वीकारण्यात येतील. २२ जानेवारीला गोपुरी आश्रम येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत काव्य सादरीकरण स्पर्धा होईल. प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषक तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्राने गौरविण्यात येईल.
----------------
सावडावला विविध कार्यक्रम
कणकवली ः प. पू. ब्रह्मीभूत कैवल्याश्रम स्वामी महाराज यांचा ८१ वा पुण्यतिथी उत्सव ३१ ला शिवडाव येथील श्री परमार्थ साधनालयात (श्री स्वामी मठात) होणार आहे. यानिमित्त २४ ते ३१ पर्यंत विविध सांप्रादायिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २४ ते ३० पर्यंत पहाटे ४ वाजता काकड आरती, पूजा, तीर्थप्रसाद, सकाळी ९ वाजता श्री गुरुचरित्र वाचन, ११ वाजता भजन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता कीर्तन, आरती, रात्री ८.४५ वाजता कीर्तन होईल. ३१ ला पहाटे ४ वाजता काकड आरती, पूजा, सकाळी १०.३० वाजता भजन, कीर्तन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता भजन, पालखी मिरवणूक होणार आहे.
-----------------
तुळस हायस्कूलचे यश
वेंगुर्ले ः तालुकास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये श्री शिवाजी हायस्कूल तुळसने यश संपादन केले. १४ सांघिक प्रकारात वर्षांखालील मुली आणि १७ वर्षांखालील मुली यामध्ये प्रशालेचा संघ उपविजेता ठरला. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या जिल्हा निवड चाचणीत प्रशालेची विद्यार्थिनी भक्ती माळकर हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे मुख्याध्यापक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक घोडेपाटील, प्रशालेचे सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.