
तळेरे विद्यालयास संगणक संच
69317
तळेरे ः माध्यमिक विद्यालयाला संगणक प्रदान करताना विजय घरत. (छायाचित्र : एन. पावसकर)
तळेरे विद्यालयास संगणक संच
तळेरे : मुंबई येथील समाजसेवक विजय घरत यांच्याकडून तळेरे येथील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयाला एक संगणक प्रदान करण्यात आला. हा संगणक संच शाळा समिती सदस्य व माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते देण्यात आला. या मदतीबद्दल प्रशालेतर्फे आभार मानण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, शाळा समिती सदस्य नीलेश सोरप, उमेश कदम, तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस, कासाडे केंद्रप्रमुख संजय पवार, वारगावचे पदवीधर शिक्षक सत्यवान केसरकर, खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल, तळेरे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीराम विभुते, अनिल मेस्त्री, चंद्रकांत तळेकर, उदय तळेकर, दीपक नांदस्कर आदी उपस्थित होते. विद्यालयाला दिलेल्या मदतीबद्दल घरत यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.