राजापूर-राजापुरात सरासरी 50 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरात सरासरी 50 टक्के मतदान
राजापूर-राजापुरात सरासरी 50 टक्के मतदान

राजापूर-राजापुरात सरासरी 50 टक्के मतदान

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१८p३१.jpg-राजापूर ः मतदानासाठी जात असलेले अक्षय तळेकर.


राजापुरात सरासरी ५० टक्के मतदान

पाचलमध्ये नवरदेव मतदानकेंद्रावर ; सकाळच्या टप्प्यात अल्प प्रतिसाद
राजापूर, ता. १८ ः तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या आखाड्यामध्ये नशीब आजमावत असलेल्या उमेदवांचे राजकीय भविष्य ठरविणारे मतदान आज झाले. मतदानाच्या शुभारंभाला सकाळच्या सत्रामध्ये मतदारांकडून फारसा प्रतिसाद दिसत नसला तरी पहिल्या तासाभरानंतर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पाचल येथे नवरदेवाने लग्नमंडपात जाण्यापूर्वी मतदानाचा हक्का बजावला.
अक्षय तळेकर याचे पाचल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये विवाह होता. लग्नमंडपात जाण्यापूर्वी ते मोजक्या सहकार्‍यांसमवेत मतदान केंद्रावर आला. नवरदेवाच्या पेहरावामध्ये येत त्याने मतदान करून नंतर विवाहस्थळी रवाना झाला.
मतदानाला सकाळी सुरवात झाल्यानंतर मतदारांना मतदान केंद्रावर आणणे, आपले चिन्ह त्यांना सांगणे, आपणालाच वा आपल्या उमेदवाराला मतदान का करावे याचे महत्व पटवून देणे यासाठी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग गावागावामध्ये दिसत होते. कार्यकर्त्यांचे बुथ गजबजलेले दिसत होते. पहिल्या तासामध्ये मतदारांकडून फारसा प्रतिसाद दिसला नाही. त्यानंतर हळूहळू मतदानाचा टक्का वाढू लागला. त्यामध्ये दुपारपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.