गुहागर-गुहागरमध्ये हिरकणी संघाची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-गुहागरमध्ये हिरकणी संघाची स्थापना
गुहागर-गुहागरमध्ये हिरकणी संघाची स्थापना

गुहागर-गुहागरमध्ये हिरकणी संघाची स्थापना

sakal_logo
By

-rat१८p३६.jpg- KOP२२L६९३४२गुहागर : हिरकणी शहरस्तर संघाची स्थापना करणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्या
-------------------

गुहागरमध्ये हिरकणी संघाची स्थापना
४८ बचत गटांचा सहभाग ; प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुहागर, ता. १८ : दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील असलेल्या ४८ स्वयंसहाय्यता बचत गट महिलांनी मिळून निर्माण केलेल्या हिरकणी शहरस्तर संघाचे गुहागर नगरपंचायतीच्या वतीने उदघाटन करण्यात आले. बचत गटांनी उत्पादित मालाच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या हिरकणी शहरस्तर संघाचे उदघाटन नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सहआयुक्त महेश चौधरी, अधीक्षक भूषण चिने, राज्य अभियान व्यवस्थपन रवींद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, समुदाय संघटक सौ. सुचिता आंबोकर उपस्थित होते.
उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांनी हिरकणी शहरस्तर संघाला रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र वितरित केले. बचत गटाचे काम उत्तम सुरू आहे. त्याचबरोबर त्यांना अजूनही प्रशिक्षण देऊन उत्तमरित्या काम करून आपल्या कुटुंबाला, संसाराला आर्थिक हातभार लावता येईल. यासाठी प्रयत्नशील असावे. मार्केटींग व्यवस्थेसाठी महाराष्ट्र पातळीवर वेबसाईट पोर्टल सुरू करत असल्याचे रोहीदास दोरकुळकर यांनी सांगितले.
हिरकणी शहरस्तर संघाच्या अध्यक्षपदी सौ. रश्मी पालशेतकर, संघ सचिव म्हणून सौ. स्वाती कचरेकर, खजिनदार सौ. निधी सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
यानिमित्ताने गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांनी उत्पादीत केलेल्या विविध मालाबरोबर कलाकुसर, कौशल्य या वस्तूंचे प्रदर्शन व स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या प्रदर्शनात श्रेयस स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने कोकणी प्रोडक्ट, खाद्य पदार्थ, सर्व प्रकारचे पापड, तळलेले फणस गरे, रूची बचत गटाने खाद्यपदार्थ, लाडू, आम्रपाली बचत गटाने पौष्टीक लाडू, शेगदाणा लाडु, शहानुर बचत गटाने सुशोभित केलेली गोधडी ज्याची विक्री ही एक गोधडी १० हजार रुपयापर्यंत होते. माशाहल्लाह बचत गटाचे मसाले, पापड, गारमेंटस, कोकमदेवी बचत गटाच्या उश्या, मातीची भांडी, लोकराच्या वस्तू तर श्री नाम्या बचत गटाच्या कुळीथ पीठ व सर्व प्रकारचे पीठ या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या वेळी गुहागर नगरपंचायतीच्या शिक्षण सभापती सौ. मनाली सांगळे, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. स्नेहल रेवाळे, सौ. अवंती गमरे, दिक्षा माटल, सौ. विभा गमरे, बचत गटातील २०० महिला उपस्थित होत्या.