खेड-खेड तालुक्यात सुमारे 60 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेड तालुक्यात सुमारे 60 टक्के मतदान
खेड-खेड तालुक्यात सुमारे 60 टक्के मतदान

खेड-खेड तालुक्यात सुमारे 60 टक्के मतदान

sakal_logo
By

rat१८३९.txt

बातमी क्र. ३९ (पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१८p३८.jpg- KOP२२L६९३४४ खेड ः भोस्ते ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रियेसाठी आलेले ग्रामस्थ.
-----------
खेड तालुक्यात ६० टक्के मतदान

आठ ग्रामपंचायतींची प्रक्रिया शांततेत ; मंगळवारी मतमोजणी

खेड, ता. १९ ः खेड तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आज शांततेत झाली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६०.९१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक जाहीर झालेल्या दहा ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे ८ ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या ३० जागा आणि सरपंचपदाच्या ८ जागांसाठी मतदान झाले.
महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे आठही ग्रामपंचायतीच्या निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्या. अलसुरे, भेलसई, भोस्ते, चिंचवली, घाणेखुंट, कळंबणी बुद्रुक, कोंडिवली, निळीक, संगलट, तिसंगी या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. या दहापैकी तिसंगी आणि अलसुरे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरवात झाली. पहिल्या सत्रात मतदान केंद्रावर तेवढी गर्दी नव्हती. दहानंतर मतदारांची गर्दी वाढू लागली आणि मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांग दिसू लागल्या. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर चांगली गर्दी होती. दुपारी तीन नंतर मतदान केंद्रांवर पुन्हा मतदारांनी गर्दी केली. ऊन कमी होताच मतदार पुन्हा मतदानासाठी घराबाहेर पडले होते. निवडणूक शाखेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ६०.९४ टक्के मतदार झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलिसांनी केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. खेडचे सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनावाखाली पोलिस मतदान केंद्रावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. मंगळवारी (ता. २०) मतमोजणी होणार आहे.