गुहागर-ग्रामपंचायतीचा कौल महिलांच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-ग्रामपंचायतीचा कौल महिलांच्या हाती
गुहागर-ग्रामपंचायतीचा कौल महिलांच्या हाती

गुहागर-ग्रामपंचायतीचा कौल महिलांच्या हाती

sakal_logo
By

ग्रामपंचायतीचा कौल महिलांच्या हाती
गुहागर तालुका ; १४ गावात ६२ टक्के मतदान
गुहागर, ता. १८ ः तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. १४ ग्रामपंचायतींपैकी पाटपन्हाळेतील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. तालुक्यातील निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात उपसरपंचपद आणि समाज हे दोन मुद्दे प्रभावी बनले होते.
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक होत आहे. त्यामध्ये आबलोली, कौंढर काळसूर, खोडदे, चिखली, जानवळे, वरवेली, हेदवी, झोंबडी, या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात आहेत. आरे ‍ग्रामपंचायतीमध्ये ३, धोपावे (४) पांगारीतर्फे हवेली (३), पाटपन्हाळेमध्ये सर्वाधिक ४ उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. २१ ग्रामपंचायतींच्या ६५ प्रभागांमधून ग्रामपंचायत सदस्यांच्या १७३ जागांपैकी ११५ जागा बिनविरोध निवडून आल्या. १३ ग्रामपंचायतींमध्ये ५८ जागांसाठी एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत.
दुपारी ३.३० पर्यंत झालेल्या मतदानाप्रमाणे आबलोलीत ६०.२५ टक्के, हेदवी- ५२.७७, पांगारीतर्फे हवेली- ६२.५९, कौंढर काळसुर- ६१.३६, धोपावे- ४०.९५, वरवेली- ६१.१२, पाटपन्हाळे- ६०.२९, खोदडे- ४७.६३, कोतळूक- ५३.२९, पोमेंडी गोणवली- ६४.४१, झोंबडी- ७०.१०, चिखली- ५४.२४, आरे वाकी पिंपळवट- ५६.४६, जानवळे- ६४.७३ टक्के मतदान झाले. एकूण २१ हजार ४७७ मतदारांपैकी १२ हजार ३८३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिला मतदारांची संख्या ६ हजार ६०८ व पुरुष मतदार ५ हजार ७७५ अशी आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कौल महिलांच्या हाती आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात ५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एका व्यक्तीने पोलिस पाटीलांना निवडणुकीच्या संदर्भाने शिवगाळ केली. मात्र त्याचा मतदानाच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही.