कुडाळमध्ये सरासरी ६५.७३ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये सरासरी 
६५.७३ टक्के मतदान
कुडाळमध्ये सरासरी ६५.७३ टक्के मतदान

कुडाळमध्ये सरासरी ६५.७३ टक्के मतदान

sakal_logo
By

69395
नेरूर ः वाघोसेवाडीत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याबाबत लावलेला बॅनर.
69396
हिर्लोक ः वरचा सावंतवाडा (किनळोस) येथील १०३ वर्षांच्या सत्यभामा सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला.


कुडाळमध्ये सरासरी
६५.७३ टक्के मतदान

नेरूर-वाघोसेवाडीत अवघे दहा

कुडाळ, ता. १८ ः तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींच्या मतदानाची प्रक्रिया आज शांततेत पार पडली. एकूण सरासरी ६५.७३ टक्के मतदान झाले. तालुक्यात ५४ सरपंचपदांसाठी १३८, तर ४४८ सदस्यपदांसाठी ८९७ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. विशेष म्हणजे मतदानावर बहिष्कार पुकारलेल्या नेरूर-वाघोसेवाडी येथील सुमारे २०० मतदारांपैकी केवळ १० मतदारांनी मतदान केल्याचे समजते. माणगाव-कुंभारवाडी प्रभाग ४ मध्ये किरकोळ धक्काबुक्की झाली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे व त्यांची टीम दाखल झाली होती. याबाबत कोणाचीही तक्रार नसल्याने या वादावर पडदा पडला. दरम्यान, निवडणुका आल्या की सातत्याने विकासकामांचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही, असा निर्धार नेरूर वाघोसेवाडी येथील ग्रामस्थांनी बैठकीत करून सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्धार त्यांनी कायम ठेवत तेथील १३० कुटुंबांतील २०० मतदारांपैकी केवळ १० जणांनी मतदान केले. रस्ताप्रश्न व इतर विकासकामांबाबत हालचाल होईपर्यंत निवडणुकीवरील बहिष्काराबाबतचा बॅनरही वाडीत कालपासून झळकत होता.