देवगडात ६३.७६ टक्के मतदान, प्रक्रिया शांततेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात ६३.७६ टक्के 
मतदान, प्रक्रिया शांततेत
देवगडात ६३.७६ टक्के मतदान, प्रक्रिया शांततेत

देवगडात ६३.७६ टक्के मतदान, प्रक्रिया शांततेत

sakal_logo
By

देवगडात ६३.७६ टक्के
मतदान, प्रक्रिया शांततेत

२३ हजार जणांनी बजावला हक्क

देवगड, ता. १८ ः तालुक्यातील एकूण ३३ ग्रामपंचायतींसाठी आज सरासरी ६३.७६ टक्के इतके मतदान झाले. एकूण ३५ हजार ९५४ इतक्या मतदारांपैकी २२ हजार ९२४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. एकूण ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या. तसेच सरपंचपदाच्या आठ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे ३३ ग्रामपंचायतीसाठी एकूण ९५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. पहिल्या टप्प्यात दुपारपर्यंत सर्वत्र बर्‍यापैकी मतदान झाल्याचे चित्र होते. मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची रांग लागली होती. वयोवृध्दांनीही मतदान केल्याचे दिसत होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ५६.४६ टक्के इतके मतदान झाले होते. साडेतीनपर्यंत सुमारे २० हजार २९८ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकूण सरासरी ६३.७६ टक्के इतके मतदान झाले. यामध्ये १० हजार ९४८ स्त्री मतदार आणि ११ हजार ९७६ पुरुष मतदार असे एकूण सुमारे २२ हजार ९२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. थेट सरपंच निवडीमुळे मतदानामध्ये उत्साह जाणवत होता. मतदारांना वेळीच मतदान करण्यास सांगितले जात होते. थेट सरपंच निवडणुकीमुळे तालुक्यातील सरपंच निवडणुकीतील चुरस वाढली आहे. येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्रावरील मतदान पेट्या आणल्या जात होत्या. यावेळी पोलिस बंदोबस्त होता. सर्व प्रक्रिया शांततेत सुरु होती. ग्रामपंचायत निहाय मतदान झालेले मतदान असेः साळशी (६७.४२ टक्के), किंजवडे (७३.६८ टक्के), पेंढरी (६१.५० टक्के), बापर्डे (५८.७२ टक्के), सौंदाळे (७० टक्के), वाघोटण (८०.५० टक्के), तोरसोळे (६७.०४ टक्के), हडपीड (६१.७४ टक्के), पोंभुर्ले (६२.०४ टक्के), गिर्ये (६८.७१ टक्के), कुवळे (५६.७८ टक्के), मणचे (५९.१६ टक्के), चांदोशी (५७.८५ टक्के), सांडवे (७३.९७ टक्के), खुडी (६३.६६ टक्के), कोटकामते (६०.५६ टक्के), विजयदुर्ग (५०.९९ टक्के), बुरंबावडे (७०.४८ टक्के), कुणकवण (४०.०७ टक्के), पडेल (६२.१२ टक्के), दहिबांव (५६.४१ टक्के), नारिंग्रे (६५.८५ टक्के), ओंबळ (६७.६३ टक्के), महाळुंगे (७३.६५ टक्के), नाद (४८.६८ टक्के), हिंदळे (५९.४६ टक्के), कट्टा (६३.७० टक्के), पोयरे (७१.५६ टक्के), दाभोळे (६५.६२ टक्के), उंडील (६१.४३ टक्के), वाघिवरे -वेळगिवे (५७.४३ टक्के), मिठमुंबरी (७१.०४ टक्के), फणसे (७५.६२ टक्के).