श्रमिक कामगार संघटनेची कामगार मंत्री खाडेंशी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमिक कामगार संघटनेची कामगार मंत्री खाडेंशी चर्चा
श्रमिक कामगार संघटनेची कामगार मंत्री खाडेंशी चर्चा

श्रमिक कामगार संघटनेची कामगार मंत्री खाडेंशी चर्चा

sakal_logo
By

swt१९१.jpg
६९४७२
मुंबईः श्रमिक कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी कामगार मंत्री खाडे यांची भेट घेतली.

श्रमिक कामगार संघटनेची
कामगार मंत्री खाडेंशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत कामगार शिष्यवृत्ती मंजुरीसह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. जिल्ह्यात कायमस्वरुपी कामगार अधिकारी व पुरेसा स्टाफ मिळावा. कामगारांना शिष्यवृत्तीमधील त्रुटी सुधारण्यास सात दिवसांचा दिलेल्या अवधीत वाढ करावी. जिल्ह्यात कामगार भवन व्हावे. कामगारांना हक्काचे घरकुल मिळावे. या योजनेसाठी सबसिडी देण्यात यावी. ज्यांची ऑफलाईन शिष्यवृत्ती खात्यात जमा झाली नाही, त्यांच्या प्रलंबित अर्जांची तत्काळ तपासणी करावी, आदी विविध मुद्द्यांवर कामगार मंत्री खाडे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
चर्चेनंतर कामगार मंत्र्यांनी तत्काळ कामगार आयुक्तांना २१ डिसेंबरच्या आत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पूर्ण आढावा मंत्रालयात पोहोचण्याबाबत शिफारस केली. त्यानुसार जिल्ह्यातील कामगारांना मोबाईलद्वारे मेसेज जाऊन प्रलंबित अर्ज तत्काळ तपासणी करून पुन्हा भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. ज्या कामगारांना मोबाईलमध्ये मेसेस आला नसेल, त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. यावेळी प्रदेश मार्गदर्शक पंढरी चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष भारत पेंडूरकर, प्रदेश सल्लागार रवींद्र चिपळूणकर, प्रदेश सहसचिव राजेश सुसविरकर आदी उपस्थित होते.