क्रीडा महोत्सवास माणगावात प्रारंभ माणगावात प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा महोत्सवास माणगावात प्रारंभ
माणगावात प्रारंभ
क्रीडा महोत्सवास माणगावात प्रारंभ माणगावात प्रारंभ

क्रीडा महोत्सवास माणगावात प्रारंभ माणगावात प्रारंभ

sakal_logo
By

swt१९३.jpg
६९४७४
माणगावः शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना एकनाथ केसरकर.

क्रीडा महोत्सवास माणगावात प्रारंभ
कुडाळः माणगाव हायस्कूलच्या मैदानावर श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे सचिव तथा माजी उपमुख्याध्यापक एकनाथ केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. विविध खेळांमुळे आरोग्य सुदृढ होते. खेळातून अंगात शिस्त येते. शूटिंग बॉल, टेनिस क्रिकेटमध्ये माणगावने आपला दबदबा निर्माण केला होता. यात अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान होते. असे खेळाडू तुमच्यातून निर्माण झाले पाहिजेत, असे आवाहन केसरकर यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण, शिक्षक प्रशांत आडेलकर, अमोल दळवी, साक्षी साटेलकर, गिरीश गोसावी, शंकर तामाणेकर, दिलीप गाडेकर, आर. एम. कदम, सुरेश कुडाळकर, चंद्रकांत पटकारे, लवू सावंत आदी उपस्थित होते.
...............
swt१९४.jpg
69475
कुडाळः गंगा हॅण्डलूमच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (छायाचित्रः अजय सावंत)

हातमाग प्रदर्शनास कुडाळात प्रतिसाद
कुडाळः ग्राहकांच्या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा सहा महिन्यानंतर सोलापूरच्या श्री गंगा हॅण्डलुमच्या हातमाग व यंत्रमाग कापडाच्या भव्य प्रदर्शन विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वाढता प्रतिसाद पाहता हे प्रदर्शन २६ पर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्य जिल्हापातळीवर सोलापूरचे श्री गंगा हॅण्डलुम यांच्या हातमाग व यंत्रमागवरील कापडाने आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनामुळे नावलौकिक मिळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे प्रदर्शन नावारुपास आले आहे. विविध उत्पादनांवर २० टक्के सूट दिली आहे. या प्रदर्शनाला कुडाळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आयोजक गणेश बल्लू व मोहन माडगुंडी यांनी सांगितले. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे.