पावस : जागतिक हवामान बदलाची प्रगत राष्ट्रांवर जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस : जागतिक हवामान बदलाची प्रगत राष्ट्रांवर जबाबदारी
पावस : जागतिक हवामान बदलाची प्रगत राष्ट्रांवर जबाबदारी

पावस : जागतिक हवामान बदलाची प्रगत राष्ट्रांवर जबाबदारी

sakal_logo
By

फोटो- rat१९p२०.jpg -KOP२२L६९४८१ मावळंग्यातील संशोधक विद्यार्थी राजस शिंदे.

जागतिक हवामान बदल भाग १ .......... लोगो

हवामान बदलाची प्रगत राष्ट्रांवर जबाबदारी

राजस शिंदे; मावळंग्यातील तरुणाने घेतला संयुक्त राष्ट्राच्या परिषदेचा वेध
पावस, ता. १९ ः जागतिक पातळीवर वाढत असलेल्या प्रदुषणाचा प्रमुख भाग हा कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांसारख्या खनिज इंधनातून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड आहे. त्यामुळे हवामानातील बदल कमी करण्याच्या जबाबदारीचा मोठा वाटा श्रीमंत विकसित देशांनी उचलावा, हे अपेक्षित आहे तसेच, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीच्या जीवाश्म स्त्रोतांचा वापर कमी करण्यासाठी प्रगत देशांनी विकसनशील देशांना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या मदत करणेही आवश्यक आहे; मात्र ही समस्या किती मोठी आहे, याचा अनुभव नुकत्याच संपलेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेत आला, अशी माहिती राजस दत्तात्रय शिंदे या पीएचडीसाठी संशोधन करणाऱ्या तरुणाने ''सकाळ''ला दिली.
राजस शिंदे हे मूळचे पावसनजीकच्या मावळंगे गावचे. महाविद्यालयीन काळातच वेगळे काही शिकण्याची आकांक्षा असल्याने ते वेगळ्या वाटेला वळले. पीएचडीसाठी हवामान बदलसारख्या बाबींचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे त्यांना जागतिक पातळीवरील युनोची हवामान बदल परिषद अर्थात सीओपी २७ येथे जाण्याची संधी मिळाली. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, ‘विकसित राष्ट्रांनी मदत करण्याचा हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. कारण, सगळेच देश आपापले हित जपत आहेत. जगभरातल्या वाढत्या उद्योगांच्या प्रभावामुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे अधिक कठीण होत आहे. यासाठीच सर्व देशांना चर्चेसाठी एकत्र आणून या कठीण समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
२०० वर्षांपासून मानवी क्रियाकल्पामुळे प्रदुषणात वाढ झाल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कार्बन डायऑक्साइड, मिथेन इत्यादी वातावरणातील हरितगृह वायूंचे वाढणारे प्रमाण उष्णता अडवते आणि ग्रहाचे तापमान वाढवते. खिडक्या बंद करून उन्हात उभ्या असलेल्या गाडीमध्ये उष्णता वाढते त्याप्रमाणेच. या घटनेला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ म्हणतात. जागतिक तापमान वाढ आणि संबंधित हवामान बदलाचे आपल्या पर्यावरणावर असंख्य हानिकारक परिणाम होतात. त्यापैकी काही म्हणजेच हीमनद्या वितळणे, समुद्राची पातळी उंचावणे, अचानक पूर येणे, दुष्काळ, वाळवंटीकरण बदल जगभरात या घडीला होत आहेत आणि हा भविष्यातला फार मोठा धोका आहे. पूर, वणवे, उष्णतेच्या लाटा यासारख्या आपत्ती पूर्वी घडत नसत अशा ठिकाणीही वांरवार होऊ लागल्या आहेत.
औद्योगिकरणापूर्वीच्या तुलनेत जागतिक तापमानात १.१ अंशाने वाढ झाली असतानाच हे सर्व बदल घडत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते जर आपण हरितगृह वायूंचे उत्सर्जन अशाच प्रमाणे सुरू ठेवले तर येत्या ५० ते ७० वर्षात जागतिक तापमान २.५-३°सेल्सिअस ने वाढू शकते.

चौकट
प्रतिनिधी मंडळामध्ये निवड
संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान बदल परिषद इजिप्त येथे पार पडली. परिषद हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदांपैकी एक आहे. युनिर्व्हसिटी कॉलेज कॉर्क, आर्यलंड या विद्यापीठामध्ये बायोरिफायनरी या विषयामध्ये पीएचडी संशोधक म्हणून काम करत असताना COP२७ मध्ये सहभागी होण्यासाठी १० सदस्यीय प्रतिनिधी मंडळामध्ये माझी निवड करण्यात आली, असे शिंदे यांनी सांगितले.