
तळवडे जनता विद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धांत यश
swt१९५.jpg
६९४७६
पूजा सावंत
तळवडे जनता विद्यालयाचे
विविध क्रीडा स्पर्धांत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांत घवघवीत यश संपादन केले.
विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा सावंत हिने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय लांब उडी क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची सातारा येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच तिने तालुकास्तरीय ६०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम, आंबोली येथील सैनिक स्कूल आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत साडेपाच किलोमीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या मॅरेथॉन स्पर्धेत सुरेखा केरकर हिने तृतीय, मुलांच्या स्पर्धेत यशवंत तळवडेकर याने चौथा क्रमांक पटकावला. तन्वी घोगळे हिने तालुकास्तरीय सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात ४०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. चौदा वर्षांखालील तालुकास्तरीय रिले स्पर्धेत मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विजय सोनवणे, अंकुश चौरे, शांताराम गवई यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर व माजी विद्यार्थिनी अश्विनी हिरोजी यांनी पूजा सावंत हिला रोख पारितोषिके देऊन विशेष अभिनंदन केले.