दापोली तालुक्यात 65.27 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोली तालुक्यात 65.27 टक्के मतदान
दापोली तालुक्यात 65.27 टक्के मतदान

दापोली तालुक्यात 65.27 टक्के मतदान

sakal_logo
By

rat१९२७.txt

( पान २ )
-----
मतांच्या टक्केवारीने राजकीय पक्षात नाराजी

दापोली तालुका ; २१ ग्रामपंचायतीसांठी ६५.२७ टक्के मतदान

दाभोळ, ता. १९ ः दापोली तालुक्यात काल (ता.१८ ) झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीबाबत राजकीय पक्ष समाधानी नाहीत. हे पक्ष थेट निवडणुकीत नव्हते तरी त्यांचा सहभाग ुघड होता. मात्र अपेक्षेपेक्षा मतदान कमी झाल्याचा सूर अनेक दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी लावला.तालुक्यात ६५.२७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दापोली तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये २० सरपंचपदासाठी ५३ उमेदवार तर सदस्यपदाच्या ३८ जागांसाठी ७९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात काल बंद झाले असून दापोलीत काल सकाळी ७.३० वा. अत्यंत शांततेत मतदानाला सुरवात झाली. दापोली तालुक्यात एकूण ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी देगाव, दमामे, भडवळे, सारंग, सोवेली, टाळसुरे, शिरसाडी, बोडींवली, विरसई या ९ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात तेथील ग्रामस्थांना यश आले तर आगरवायंगणी, आपटी, उसगांव, उंबरशेत, उंबर्ले, करजगाव, कळंबट, कादिवली, कुडावळे, करंजाणी, कोळबांद्रे, जालगाव, देहेण, पाचवली, मुर्डी, वांझळोली, वेळवी, शिर्दे, सडवे, सातेरेतर्फे नातू व हातिप या २१ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीसाठी मतदान झाले.
करजगाव या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसुचित जमाती स्त्रीसाठी राखीव असल्याने या प्रवर्गातील एकही अर्ज दाखल न झाल्याने २० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक झाली. २० जागांसाठी ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर २१ ग्रामपंचायतीच्या ३८ सदस्यपदासाठी ७६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. २१ ग्रामपंचायतीच्या ६५ प्रभागामध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी ६९ मतदान केंद्र उभारण्यात आली होती. वांझळोलीमध्ये १ तर जालगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ३ असे एकूण ४ साहाय्यकारी केंद्र उभारण्यात आली होती. २१ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले होते. ४१४ निवडणूक कर्मचारी यांनी मतदान केंद्रात काम पाहिले. २१ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २३ हजार ४९ मतदारांपैकी १५ हजार ४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या (ता. २०) सकाळी १० वाजल्यापासून दापोली शहरातील चैतन्य सभागृहात १२ टेबलावर मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

---