डॉ. शंकर नाईक यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. शंकर नाईक यांचे निधन
डॉ. शंकर नाईक यांचे निधन

डॉ. शंकर नाईक यांचे निधन

sakal_logo
By

swt1915.jpg
69578
डॉ. शंकर नाईक

डॉ. शंकर नाईक यांचे निधन
बांदा, ता. १९ः शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रासह जनतेची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकत अखेरपर्यंत वैद्यकीय सेवा बजावणारे मडुरा तिठा येथील अर्धांगवायू तज्ज्ञ डॉ. शंकर आत्माराम नाईक (वय ८३) यांचे निधन झाले. डॉ. नाईक यांनी रोणापाल गावच्या उपसरपंचपदाची धुरा सांभाळत गावाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. मडुरा न्यु इंग्लिश स्कूल कमिटीचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मडुरा मारुती मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गोवा-उगवे येथील डॉ. अमित नाईक, मडुरा राजश्री मेडिकलचे सुनील नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल संघटनेचे उपाध्यक्ष तथा रेडी भागीरथी मेडिकलचे विद्याधर नाईक यांचे ते वडील होत.