चिपळूण ः स्पर्धा परीक्षांसाठी जिद्द व मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  स्पर्धा परीक्षांसाठी जिद्द व मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे
चिपळूण ः स्पर्धा परीक्षांसाठी जिद्द व मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे

चिपळूण ः स्पर्धा परीक्षांसाठी जिद्द व मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे

sakal_logo
By

फोटो - ratchl194.jpg ः KOP22L69573 चिपळूण ः सुधीर शिंदे यांचा सत्कार करताना पदाधिकारी.

स्पर्धा परीक्षांसाठी पाहिजे जिद्द,मेहनतीची तयारी

विकास सावंत ; महाभरतीसाठी मोफत सेमिनार

चिपळूण, ता. 19 ः अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तेव्हा विद्यार्थी व तरुणांनी खचून न जाता जिद्द, मेहनत सुरूच ठेवा. यश दूर नाही, असे प्रतिपादन मुंबई येथील स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ विकास सावंत यांनी केले. माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या भरतीनिमित्त चिपळूण नगर पालिकेमोरील सावरकर सभागृहात मोफत मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले होते.
सावंत म्हणाले, ‘शासकीय नोकरीकरिता स्पर्धा परीक्षांसाठी तुमच्याकडे अभ्यास करण्याची जिद्द व मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे’.
आयोजक सुधीर शिंदे यांनी उपस्थित स्वागत केले. बापू काणे म्हणाले,‘ शिंदे हे उत्साही व्यक्तिमत्व आहेत. सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थी व तरुणांना योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. शासकीय नोकरी मिळवत असताना स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. तेव्हा विद्यार्थ्यांनी अपयश आले म्हणून नैराश्य आणू नये. स्पर्धेत टिकायचे आहे.’
माजी नगरसेविका सीमा रानडे म्हणाल्या, ‘ जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्राचा अभ्यास मनात जिद्द ठेवून करा. तुम्हाला ज्यांनी घडवलं असेल त्यांना कधीच विसरू नका. केंद्र सरकारच्या महाभरतीबद्दल तुमच्या मनाच्या काही शंका असतील त्या शंका या सेमिनारच्या माध्यमातून विचारून घ्या तसेच केंद्र शासनात नोकरी मिळवण्यासाठी जिद्द मनात ठेवा. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.’ या वेळी माजी नगरसेविका सफा गोठे, निर्मला जाधव, दीपक निवाते, स्नेहा आंबले, राकेश दाते, शांताराम गाडे, प्रकाश विंचू आदी उपस्थित होते.