शिवसेना फुटीनंतर कौल कोणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना फुटीनंतर कौल कोणाला
शिवसेना फुटीनंतर कौल कोणाला

शिवसेना फुटीनंतर कौल कोणाला

sakal_logo
By

शिवसेना फुटीनंतर कौल कोणाला?
१६३ ग्रामपंचायतींचा आज निकाल; उत्सुकता शिगेला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : जिल्ह्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकूण ६२.८३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक प्रतिसाद खेड तालुक्यात मिळाला असून, तेथे ६६.७८ टक्के मतदान झाले. सर्वात कमी ५७.१० टक्के मतदान संगमेश्वर तालुक्यात झाले. उद्या (ता. २०) निकाल असून जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि १५५ सरपंचपदाचे दावेदार कोण, हे दुपारपर्यंत ठरणार आहे. यात खरी चुरस असणार आहे ती ठाकरे सेना आणि शिंदे सेनेमध्येच.
जिल्ह्यात रविवारी पहिल्या दोन तासात १६.४३ टक्के मतदान झाले. सकाळी साडेअकरापर्यंत ३४.४५ टक्के, दुपारी दीडपर्यंत ४८.९८, साडेतीनपर्यंत ५७.३१ मतदान झाले. शेवटच्या दोन तासात ५. ५२ टक्केच वाढ दिसून आली.
एकूण दोन लाख १५ हजार ३९९ पैकी एक लाख ३५ हजार ३२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला मतदार आघाडीवर असून एकूण एक लाख १२ हजार ६२४ पैकी ६९ हजार २७० महिलांनी मतदान केले. एकूण एक लाख दोन हजार ७७५ पैकी ६६ हजार ५८ पुरुषांनी मतदान केले. ६६३ सदस्यपदासाठी तर १५५ सरपंचपदासाठी मतदान झाले. तब्बल ६७ सरपंच व ११०० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंचपदासाठी ४०६, तर सदस्यपदांसाठी १२०६ उमेदवार रिंगणात आहेत. उद्या निकाल असून उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोण गुलाला उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ठाकरे सेना आणि शिंदे सेनेमध्येच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


निकाल दुपारपर्यंत
उद्या त्या-त्या तालुकास्तरावर मतमोजणी आहे. सकाळी दहाला प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. गरजेनुसार सहा किंवा त्यापेक्षा जास्त फेऱ्या होतील. दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.