कामगार सहायक संघाच्या नियुक्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार सहायक संघाच्या नियुक्त्या
कामगार सहायक संघाच्या नियुक्त्या

कामगार सहायक संघाच्या नियुक्त्या

sakal_logo
By

rat२११२.txt

(टुडे पान ४ साठी)

rat२१p१.jpg-
६९९७१
रत्नागिरी ः कामगार सहाय्यक संघातर्फे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुभाष नाईक यांच्या नियुक्तीप्रसंगी रमेश थोरात, गजानन जाधव, प्रमोद कांबळे, सुशांत सोनावले, भास्कर नाईक व पदाधिकारी.

कामगार सहाय्यक संघातर्फे विविध नियुक्त्या

रत्नागिरी ः कामगार सहाय्यक संघातर्फे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून सुभाष नाईक यांची निवड करण्यात आली. कुडाळ तालुकाध्यक्ष गणेश तेली आणि मालवण तालुकाध्यक्ष संजय पाताडे यांची निवड करण्यात आली. या वेळी संस्था सहसचिव गजानन जाधव, संपर्कप्रमुख प्रमोद कांबळे, संस्थाध्यक्ष रमेश थोरात व सुशांत सोनावले व संघटक भास्कर नाईक उपस्थित होते. असंघटित कामगारांना एकत्र आणून शासकीय योजना पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थेतर्फे कामगारांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. कामगार नोंदणी करण्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर संस्थेचे प्रतिनिधी नेमणूक केली जात आहे. त्यांना नियुक्तीपत्र संस्थाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.

----

शनिवारी पुरुषोत्तम करंडकची पुण्यात अंतिम फेरी

रत्नागिरी ः पुरुषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार (ता.२४) पासून पुण्यात रंगणार आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा राज्यभरातील युवा रंगकर्मींचा पुन्हा नाट्यजल्लोष होणार आहे. राज्यभरातील १८ महाविद्यालयांचे संघ महाअंतिम फेरीत सादरीकरण करणार असून, महाअंतिम फेरी चुरशीची होणार आहे. पुरुषोत्तम करंडक प्राथमिक स्पर्धा राज्यभरातील विविध केंद्रांवर झाल्या. भरत नाट्यमंदिर येथे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सकाळी नऊ ते एक, सायंकाळी पाच ते नऊ या दोन सत्रांमध्ये महाअंतिम फेरीतील एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. २६ डिसेंबरला सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या फेरीला परीक्षक म्हणून सुबोध पंडे, नितीन धंदुके, संजय पेंडसे असणार आहेत. पुणे आणि अमरावती-नागपूर विभागात सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका निवडण्यात आली नाही. त्यामुळे या दोन विभागातील केवळ पहिल्या तीन क्रमांकांचे संघ महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरले तर रत्नागिरी, कोल्हापूर आणि जळगाव-औरंगाबाद विभागातून प्रत्येकी चार संघ महाअंतिम फेरीत दाखल झाले आहेत.