कणकवली : उड्डाणपूल भिंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : उड्डाणपूल भिंत
कणकवली : उड्डाणपूल भिंत

कणकवली : उड्डाणपूल भिंत

sakal_logo
By

kan211.jpg
70066
कणकवली : शहरातील खचलेल्‍या उड्डाणपूल दुरूस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे.
------------
उड्डाणपूल दुरूस्तीचे काम
लवकरच सुरू होणार
सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवली जाणार
कणकवली, ता. २१ : शहरातील खचलेल्‍या उड्डाणपूल दुरूस्तीची कार्यवाही पुढील दोन दिवसांत सुरू होणार आहे. त्‍याअनुषंगाने ज्‍या ठिकाणी उड्डाणपूलाची भिंत पाडली जाणार आहे, त्‍या भागात संरक्षण जाळी बसविण्याचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे.
उड्डाणपूल दुरूस्तीचे काम दोन ते अडीच महिने सुरू राहणार आहे. या कालावधीत उड्डाणपूलावरील सर्व वाहतूक शहरातील सेवा रस्त्यावरून वळवली जाणार आहे. त्‍यामुळे शहरात वाहतूक कोंडीचीही शक्‍यता निर्माण होणार आहे.
कणकवली शहरातील उड्डाणपूल दोन वर्षापूर्वी वाहतुकीस खुला झाला. मात्र उड्डाणपुलाचा पहिला पिलर आणि एसएम हायस्कूल समोरील बॉक्‍सवेल या दरम्‍यानचा रस्ता सलग दोन वर्षे पावसाळ्यात खचला होता. चौपदरीकरण ठेकेदाराच्या या निकृष्‍ट कामाबाबत शहरवासीयांनी आंदोलनेही केली होती. त्‍यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी खचलेल्‍या उड्डाणपूल रस्त्याची नव्याने बांधणी करण्याचे. निर्देश ठेकेदाराला दिले होते. त्‍यानुसार गेल्‍या महिन्यात ठेकेदाराने काम सुरू केले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणूका असल्‍याने हे काम लांबणीवर गेले होते. तसेच कणकवली नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनीही शहरातील अपूर्ण पाणी पुरवठा वाहिनी पूर्ण करावी अन्यथा दुरूस्ती कामाला विरोध करण्याचा इशारा दिला होता.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्‍यानंतर ठेकेदाराने उड्डाणपूल रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. यात उड्डाणपुल रस्ता बांधणीतील सिमेंटचे बॉक्‍स सेवा रस्त्यावर कोसळू नयेत यासाठी सेवा रस्ता दुतर्फा बॅरिकेट बसवले जात आहेत. पुढील दोन दिवसांत खचलेला उड्डाणपूल रस्ता पूर्णत: काढून, तेथे सिमेंट बॉक्‍स ऐवजी सिमेंटच्या प्लेट उभारून नवा रस्ता केला जाणार असल्‍याची माहिती महामार्ग ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उदय वीर यांनी दिली.