
साखरपा ः पतीपाठोपाठ पत्नी चालवणार समाजसेवेचा वसा
rat२१p२०.jpg ःKOP२२L७००४० हर्षा आठल्ये.
पतीपाठोपाठ पत्नीचा
समाजसेवेचा वसा
साखरपा ः समाजसेवेचा वसा पुढे नेणे ही क्वचित घडणारी घटना असते. असाच एक योग कोंडगावात जुळून आला आहे. मंदार आठल्येंच्या पाठोपाठ आता त्यांच्या त्यांच्या पत्नी हर्षा आठल्ये या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. मंदार आठल्ये हे शिवसेना समर्थक आहेत. २०१२ ते १७ या पाच वर्षात ते प्रथम आणि नंतर २०१७ ते २२ या काळात दुसर्यांदा ग्रामपंचायतीवर निवडून गेले. यंदा त्यांच्या पत्नी हर्षा आठल्ये यांनी कोंडगाव ग्रामपंचायत निवडणूक लढवली. गावपॅनलचे ११ उमेदवार विजयी झाले. हर्षा आठल्ये या एकमेव अपक्ष उमेदवार निवडून आल्या. मंदार यांचा राजकीय वारसा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करताना शासकीय योजना तळागाळात पोचवण्याची आवश्यकता व्यक्त केली.महिलांना रोजगारासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
-----------------
लांजामधील महिलाश्रमात ब्लँकेट वाटप
लांजा ः तालुक्यातील कुर्णे येथील आम्ही कुर्णेकर प्रतिष्ठानच्यावतीने लांजा येथील सेवाभावी संस्था महिलाश्रम लांजामधील मुलांना ब्लँकेट वाटप तसेच अन्नदान वाटप कार्यक्रम गुरुवारी (ता. १५) डिसेंबरला पार पडला. ’आम्ही कुर्णेकर प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत नेहमी शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातात. गेली ३ वर्षे या संस्थेमार्फत कुर्णे गावातील सर्व जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे. गावातील ग्रामदैवत श्री नवलाईदेवीच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून या प्रतिष्ठानच्यावतीने १५ डिसेंबरला लांजा येथील महिलाश्रम सेवाभावी संस्थेतील मुलांना अन्नदान तसेच ब्लँकेट वाटप करण्यात आले. या प्रसंगी ’आम्ही कुर्णेकर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष रामजी पडये, रविकांत चव्हाण, संदीप घडशी, दादा घडशी, अनिल गुरव आदी उपस्थित होते. दरम्यान, संस्थेत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेच्यावतीने आम्ही कुर्णेकर प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांचे आभार मानण्यात आले.
डीबीजेत ''स्पंदन'' महोत्सव
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून ''स्पंदन'' महोत्सव युवामनाचे याला दिमाखात सुरवात झाली. या निमित्ताने ग्रुप सिमिलॅरिटी,'' चॉकलेट डे, संगीतखुर्ची, दांडिया नृत्य असे भरगच्च कार्यक्रम उत्साहात पार पडले. प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. एम. एस. चांदा, उपप्राचार्य एन. एस. तळप, गॅदरिंग कमिटी चेअरमन डॉ. आर. एम. मोरे यांनी विज्ञान प्रदर्शनासह फूड फेस्टिवल व सर्व कार्यक्रमांना भेटी दिल्या. डीबीजे कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा उत्साह नेहमीच ओसंडून वाहत असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या निमित्ताने वाव मिळतो. यासाठी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन मिळत असते. या महोत्सवातून सारी डे, टाय डे, रोज डे, केमिस्ट्री फेस्टिवल, एनसीसी डे यातून एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला तसेच सांस्कृतिक विभागाच्यावतीने तिसरी घंटा या नाटकाचा प्रयोगदेखील पार पडला.