चिपळूण - नेते म्हणतात आम्हीच ग्रामपंचायतीत पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - नेते म्हणतात आम्हीच ग्रामपंचायतीत पुढे
चिपळूण - नेते म्हणतात आम्हीच ग्रामपंचायतीत पुढे

चिपळूण - नेते म्हणतात आम्हीच ग्रामपंचायतीत पुढे

sakal_logo
By

rat२१p१३.jpg ः KOP२२L७००११ शेखर निकम
rat२१p१४.jpg ःKOP२२L७००१२ विनोद झगडे
rat२१p१५.jpg ःKOP२२L७००१३ वसंत ताम्हणकर


नेते म्हणतात आम्हीच ग्रामपंचायतीत पुढे
--
दावे प्रतिदावे ; दाव्यांच्या ग्रामपंचायतीची बेरीज अधिक
चिपळूण, ता. २१ ः राजकारणामध्ये ग्रामीण भागातील केंद्रस्थान असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे रणकंदन मंगळवारी (ता. २०) निकालानंतर शांत झाले; मात्र निकालानंतर दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्ष चिन्हावर होत नाहीत. परिणामी, कोणत्या पक्षांना किती ग्रामपंचायतीवर विजय मिळाला याचे चित्रही स्पष्ट होत नाही. अशातच सर्वच पक्षांकडून ग्रामपंचायतीवर विजय मिळवल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींपेक्षा दाव्यांच्या ग्रामपंचायतीची बेरीज अधिक होत असल्याचे चित्र आहे.
चिपळूण तालुका आणि मतदार संघात सर्वाधिक ८० टक्के ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे यश आहे. चिपळुणातील पेढे, खांदाटपाली, नवीन कोळकेवाडी, असुर्डे तसेच संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी, किरडिवे, माखजन, आबंव पोक्षे, आंबवली फणसट, आंबवली मराठवाडी, फणसट या ग्रामपंचायती राष्टवादीकडे राहिल्या आहेत तर शृंगारपूर, तुरळ येथे महाविकास आघाडीची सत्ता आली तसेच फणसवणे, शिवणे पाडगांव, कळंबुशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. या वेळी राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे,असा दावा चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यानी केला.
..................

कोट क्र. १

तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठे यश मिळाले आहे. राजकीय प्रतिष्ठेची असलेली शिरगांव, परशुराम, ओमळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्याबरोबर खांदाटपाली, कळकवणे, असुर्डे या ग्रामपंचायतीवरदेखील शिवसेना ठाकरे गटाचा विजय झाला आहे. पेढे ग्रामपंचायतीत मात्र आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. चिपळूण मतदार संघाचा विचार करता १० पैकी ६ सरपंच शिवसेना ठाकरे गटाकडे तर ३ ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे राहिल्या आहेत.
- विनोद झगडे, तालुकाप्रमुख शिवसेना
..................
कोट क्र. २
भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच चांगल्याप्रकारे यश संपादन केलेले आहे. चार ठिकाणी सरपंच आणि १४ ग्रामपंचायतीत जवळपास ५० सदस्य भाजपच्या विचाराचे आहेत. या सर्वांचा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. बांधकाममंत्री चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, कार्याध्यक्ष केदार साठे यांनी सहकार्य केल्यामुळे प्रथमच चांगले यश संपादन करता आले.
- वसंत ताम्हणकर, तालुकाध्यक्ष भाजप