कासार्डेत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डेत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन
कासार्डेत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन

कासार्डेत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

swt२११७.jpg
७०१०१
कासार्डेः जात प्रमाणपत्र प्रमाणपत्रांचे वाटप करताना.

कासार्डेत जात प्रमाणपत्र
पडताळणीबाबत मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा जात प्रमाणपत्र समितीमार्फत मंडणगड पॅटर्न उपक्रमांतर्गत सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबिर कासार्डे कॉलेज येथे काल (ता. २०) झाले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मूळ गावी जात प्रमाणपत्र प्राप्त करून त्या जिल्ह्याच्या समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा. आपल्या जात प्रमाणपत्रावरील नोंदी योग्य असल्याची खात्री करावी. प्रवेश प्रक्रियेच्या पाच महिन्यांपूर्वी अर्ज सादर करावा. मानीव दिनांकापूर्वीचा जात नोंद असणारा सर्वात जुना पुरावा महत्त्वाचा आहे. मूळ कागदपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वत: बदल करू नये. न्यू ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर ३० दिवसांत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले.
................
swt२११९.jpg
70103
मिठमुंबरीः येथील किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मिठमुंबरी किनारी स्वच्छता मोहीम
देवगडः तालुक्यातील मिठमुंबरी येथील किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. येथील पोलिस आणि स. ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. किनार्‍याची स्वच्छता करण्यात आली. केरकचरा, प्लास्टिक तसेच अन्य टाकावू साहित्य गोळा करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार राजन जाधव, प्रवीण सावंत, विशाल वैजल, प्रा. संजय तायडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
.................