पाटलांच्या हकालपट्टीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटलांच्या हकालपट्टीची मागणी
पाटलांच्या हकालपट्टीची मागणी

पाटलांच्या हकालपट्टीची मागणी

sakal_logo
By

rat२१३.txt

( पान २ साठी)

चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा

भीम युवा पॅंथर संघटनेचे निवेदन
रत्नागिरी, ता. २१ ः महाराष्ट्र प्रदेशाला अनेक संत महात्मे महापुरुषांची परंपरा लाभली आहे. हा महाराष्ट्र घडवण्यात त्या महापुरुषांचे मोलाचे कार्य लाभले आहे. राज्य मंत्रिमंडळामधील प्रतिनिधीद्वारे वारंवार महापुरुषांचे अपमान करणारी वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्रांत महापुरुषांची बदनामी करणाऱ्या नेत्यांवर आपण कार्यवाही न केल्यास हा शांत असलेला महाराष्ट्र कधीही पेटून उठेल. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी भीम युवा पॅंथर या संघटनेने केली आहे. या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या बाबतीत केलेले कथित वक्तव्य हे अत्यंत खेदजनक आहे. त्याचा आम्ही सर्व जनता जाहीर निषेध करत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.