तारांगणाचा आनंद लुटला यवतमाळच्या पर्यटकांनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारांगणाचा आनंद लुटला यवतमाळच्या पर्यटकांनी
तारांगणाचा आनंद लुटला यवतमाळच्या पर्यटकांनी

तारांगणाचा आनंद लुटला यवतमाळच्या पर्यटकांनी

sakal_logo
By

rat२१७.txt

(पान २ साठी, अॅकर)

फोटो ओळी
-rat२१p२५.jpg-
७००८०
तारांगण
------------

तारांगणाचा आनंद लुटला यवतमाळच्या पर्यटकांनी

नियमित होणार २ शो ; मागणीनुसार संख्याही वाढविणार

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २१ ः येथे तारांगणाच्या थ्रीडी आणि टुडी शोला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ येथील पर्यटकांनी त्याचा आनंद घेतला. त्यामुळे दिवसाला सकाळी ११ आणि सायंकाळी ४ हे दोन शो नियमित होणार आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या मागणीवरून आयत्यावेळी शो दाखवता येणार आहे. आता कोणतीही तांत्रिक त्रुटी राहिली नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ डिसेंबरला पालिकेच्या मालकीच्या तारांगणाचे उद्घाटन झाले; परंतु पहिल्या शोला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तो रद्द करावा लागला होता. आता पुन्हा तारंगणाचे थ्रीडी आणि टुडी शो सुरू झाले आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव थ्रीडी तारंगण आहे. त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज सकाळी ११ आणि सायं. ४ चा शो निश्चित आहे. आज सकाळी ११ वा. झालेल्या थ्रीडी शोचा अनेक पर्यटकांनी आनंद घेतला. एक तासाच्या या शोला मोठ्या माणसांना १५० तर लहान मुलांना १०० रुपये शुल्क आहे तर टुडी शोला मोठ्या व्यक्तींना १०० तर लहान मुलांना ५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार इतरवेळीही शो होणार आहे. आज यवतमाळ येथील पर्यटक आले होते. त्यासाठी दुपारी २ चा शो घेण्यात आला.

शो रद्द होणार नाही...
तारांगणासाठी तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे. तोवर संबंधित एजन्सीमार्फत शो घेतले जात आहे; परंतु आता किती व्यक्ती कमी आहेत म्हणून शो रद्द केला जाणार नाही. चार व्यक्तींसाठीही शो घेतला जाईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.