चिपळूण-कामथेच्या सरपंचपदी हर्षदा कासार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-कामथेच्या सरपंचपदी हर्षदा कासार
चिपळूण-कामथेच्या सरपंचपदी हर्षदा कासार

चिपळूण-कामथेच्या सरपंचपदी हर्षदा कासार

sakal_logo
By

फोटो ओळी
-ratchl२११.jpg ः२L७०००७ चिपळूण ः सरपंच हर्षदा कासार यांचा सत्कार करताना मंगेश माटे.
-------------
कामथेच्या सरपंचपदी हर्षदा कासार

ग्रामपंचायत बिनविरोधद ; सकारात्मक संदेश
चिपळूण, ता. २१ ः तालुक्यातील महत्वाची आणि राजकीय प्रतिष्ठा असलेल्या कामथे गावची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. ज्या निवडणुकीत मोठी उलथापालथ घडायची त्या ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक करून तालुक्यास सकारात्मक संदेश देण्याचे काम केले आहे. कासार आणि माटे गटाची मोट जुळली. बैठकांवर बैठका झाल्या. नाराजांची समजूत काढली. त्यानंतर कामथेची निवडणूक बिनविरोध झाली. गावच्या सरपंचपदी हर्षदा कासार यांची एकमताने निवड केली.
तालुक्यातील कामथे गावची निवडणूक नेहमीच चुरशीची होत असे. गतवेळची निवडणूक तर जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली. निवडणुकीच्या निमित्ताने गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण होत असे. लाखो रुपयांची उलाढाल व्हायची; मात्र या साऱ्या बाबींना या वेळी दोन्ही गटांनी फाटा दिला. गेली ५ वर्षे एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप आणि भांडणात गेली. गावच्या विकासकामांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळेच दोन्ही गटांनी या वेळची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उमेवादर निश्चितीसाठी वाडीनिहाय बैठका झाल्या. जे उमेदवार इच्छुक होते; पण बिनविरोधमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही अशांची संयुक्तपणे समजूत काढण्यात आली. त्यामुळेच कामथेची निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली. पैशाचा अपव्ययदेखील कमी होण्यास मदत झाली. कामथे येथे प्रभाग १ नागरिकांचा मागास प्रवर्गमधून सचिन कांबळी, सर्वसाधारण स्त्रीमधून पूर्वा कांबळे, सर्वसाधारणमधून भागोजी गावडे, प्रभाग २ सर्वसाधारणमधून दीक्षा खेडेकर, सर्वसाधारण स्त्रीमधून श्रेया कदम, सर्वसाधारणमधून मंगेश माटे तर प्रभाग ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीमधून अंजली महाडिक, सर्वसाधारण स्त्रीमधून प्रमिला महाडिक, सर्वसाधारणमधून नाना महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल नलावडे यांनी काम पाहिले. निवडून आलेल्या सरपंच आणि सर्व सदस्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन झाले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.