टोलनाका बंद करण्याची आमदार साळवींची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोलनाका बंद करण्याची आमदार साळवींची मागणी
टोलनाका बंद करण्याची आमदार साळवींची मागणी

टोलनाका बंद करण्याची आमदार साळवींची मागणी

sakal_logo
By

rat२१४२.txt

( पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat२१p२९.jpg ः
७०१२२
राजापूर ः हातिवले येथील टोलनाका.
---
हातिवले टोलनाका बंद करा

आमदार साळवी ; सर्वपक्षीय बैठकीतील मागण्या आधी पूर्ण करा ; बांधकाममंत्र्याना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अद्यापही शंभर टक्के काम पूर्ण झालेले नाही. जोपर्यंत शंभर टक्के कामासह अन्य मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये, अशी मागणी प्रशासकीय अधिकाऱ्‍यांसमवेत यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आली. तरीही आजपासून टोलवसुली सुरू झाल्याने आमदार राजन साळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली. सर्वपक्षीय बैठकीतील मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत टोलनाका तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये तालुक्यातील हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावर वसुली करण्याला ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासनाने त्या ठेकेदाराला टोलवसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. या टोलवसुलीला तालुक्यातील सर्वपक्षीयांसह वाहनचालकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. आमदार साळवी यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अद्यापही शंभर टक्के काम पूर्ण झालेले नसून अनेक शेतकऱ्‍यांना महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेचा मोबदला मिळालेला नसल्याकडे आमदार साळवी यांच्यासह साऱ्‍यांनी लक्ष वेधले होते. महामार्गाच्या शंभर टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करू नये, स्थानिकांना टोलवसुली सवलत, नोकरीसाठी स्थानिकांना प्राधान्य आणि शेतकऱ्‍यांचा मोबदला आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय टोलवसुली सुरू करू नये असेही या वेळी सुचित करण्यात आले होते.
या साऱ्‍याची पूर्तता होण्यापूर्वी आजपासून टोलवसुली सुरू करण्यात आल्याकडे आमदार साळवी यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांचे या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. यापूर्वी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीतील सर्व विषयांची पूर्तता होईपर्यंत टोलनाका तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.