रत्नागिरी ः नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची घोषणा
रत्नागिरी ः नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची घोषणा

रत्नागिरी ः नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची घोषणा

sakal_logo
By

नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची घोषणा
२३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना चाळणी ; एप्रिल- मे महिन्यात दौरा
रत्नागिरी, ता. २१ ः अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नेण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा अंतिम निकाल लागला आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला नासाला, तर प्रथम तीन क्रमांकांना इस्रो असे एकूण २७ जणांची निवड करण्यात आली आहे. नासा दौरा एप्रिल किंवा मे महिन्यात होईल, अशी अपेक्षा आहे.
मंडणगड-प्रभुती घागरूम (कोन्हवली), श्लोक सुगदरे (मंडणगड), जान्हवी खापरे (शेडवई), दापोली- धनश्री जाधव (शिरसोली), तनिष्का बोधगावकर (जालगाव), सुयश गोसावी (मळे), खेड-कीर्ती मुंडे (असगणी), सार्थक महाडिक (धामणदिवी-बेलवाडी), वेदांत मोरे (देवघर-निवाचीवाडी), चिपळूण-दक्ष गिजये (पाग), अभय भुवड (तुरंबव), इच्छा कदम (अनारी), गुहागर-सोनाली डिंगणकर (काजुर्ली), क्षितिजा मोरे (वेळंब), मुशतहा शेख (कोंडशृंगारी), संगमेश्वर-निरज इनामदार (तुरळ), आरोही सावंत (ओझरखोल), नितीन बोडेकर (चाफवली), रत्नागिरी-वेदांत सनये (कुवारबांव), प्रेरणा भोजने (गोळप), साथिया संते (गोळप), लांजा-आशिष गोबरे (शिरवली), आर्यन गुरव (वनगुळे), वेदिता वारंगे (लांजा), राजापूर-विनया जाधव (भालावली), भूषण धावडे (पांगरे बु.), प्राजक्ता भोकरे (तुळसवडे) यांची निवड झाली.
खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात यशही येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी अमेरिकेतील नासा व भारतातील इस्रो या संस्थेला गुणवंत विद्यार्थ्यांची भेट घडवण्यात येणार आहे. यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हास्तरावरील परीक्षेसाठी ९० विद्यार्थी पात्र ठरले होते. या सर्वांच्या मंगळवारी मुलाखती पार पडल्या. यासाठी विज्ञानातील तज्ज्ञ १५ अध्यापकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी एस. जे. मुरकुटे, संदेश कडव यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी विद्यार्थी निवडीचे नियोजन केले. केंद्र स्तरावर झालेल्या परीक्षेसाठी २३ हजाराहून अधिक विद्यार्थी बसले. त्यामधून बीटस्तरासाठी २६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातून तालुकास्तरासाठी ५६० विद्यार्थी पात्र ठरले. जिल्हास्तरासाठी निवडलेल्या ९० विद्यार्थ्यांतून २७ जणांची निवड करण्यात आली.


चौकट
परवानगी घेण्याचे काम सुरू
इस्रोसाठी जानेवारी महिन्यात तारीख निश्चित केली जाणार आहे तर नासा दौरा एप्रिल किंवा मे महिन्यात होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नासासाठी पासपोर्ट, व्हिसा अशी कागदपत्रे बनवणे आणि परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे.