संगलट येथील बॅलेट मशीनचे चीप बदलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगलट येथील बॅलेट मशीनचे चीप बदलले
संगलट येथील बॅलेट मशीनचे चीप बदलले

संगलट येथील बॅलेट मशीनचे चीप बदलले

sakal_logo
By

rat२१४४.txt

( पान ३ साठी)

संगलटमध्ये मतदान यंत्रातील चीप बदलली?

ग्रामस्थांचा आरोपासह चौकशीची मागणी ; तहसीलदार, निवडणूक आयोगाकडे तक्रार

खेड, ता. २१ ः तालुक्यातील संगलट ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रातील चीप बदलली गेल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २१) खेड तहसीलदार यांच्यासह निवडणूक आयोगाकडे केली आहे.
खेड तहसील कार्यालयात बुधवारी (ता. २१) नितिन डेरवणकर, साबीर कौचाली, सिफा नाडकर, बबन चिनकटे, फरहीन कौचाली (सर्व रा. संगलट ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केल्यानुसार २०२२ सार्वत्रिक निवडणूक मौजे संगलट येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बॅलेट मशीनचे चीप मतमोजणीप्रसंगी बदलण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. १८ डिसेंबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मौजे संगलट येथे प्रभाग क्र. १ मधील मतदान यंत्रामधील जो सुरवातीला चीप नंबर देण्यात आला होता तोच चीप नंबर हा मतदानाअगोदर पेट्या सील करतेवेळी होता; परंतु मंगळवारी (ता. २०) खेड तहसील कार्यालयात मत मोजण्यापूर्वी ज्या वेळेस मतदान यंत्राचा नंबर देण्यात आला त्या वेळेस तो वेगळा होता. त्यामुळे हा नंबर बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले असून निवडणुकीसाठी ही बाब खूप गंभीर आहे. त्याचा परिणाम थेट सरपंच निवडणुकीवर झालेला दिसून येत आहे तसेच त्यांचे सहयोगी सदस्य यांच्यावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकाराची संपूर्ण सखोल चौकशी करावी व पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.