''सकाळ''चे संतोष कुळकर्णी, तुषार सावंतांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सकाळ''चे संतोष कुळकर्णी, तुषार सावंतांना पुरस्कार
''सकाळ''चे संतोष कुळकर्णी, तुषार सावंतांना पुरस्कार

''सकाळ''चे संतोष कुळकर्णी, तुषार सावंतांना पुरस्कार

sakal_logo
By

swt2128.jpg
70137
संतोष कुलकर्णी
swt2129.jpg
70164
तुषार सावंत

''सकाळ''चे संतोष कुळकर्णी,
तुषार सावंत यांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ः सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार ‘सकाळ’चे देवगड प्रतिनिधी संतोष कुळकर्णी, युवा पुरस्कार संदेश देसाई, ग्रामीण पुरस्कार संतोष गावडे, तर उर्वरित सहा आदर्श पत्रकार पुरस्कारांसाठी संजय वालावलकर, सचिन रेडकर, नीलेश जोशी, सीताराम धुरी, ‘सकाळ’चे कणकवली प्रतिनिधी तुषार सावंत, उज्ज्वल नारकर यांची निवड करण्यात आली. येत्या सहा जानेवारीला पत्रकार दिनी सिंधुदुर्गनगरी येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची बैठक आज पार पडली. या बैठकीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील ९ पत्रकारांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तोरस्कर, सचिव देवयानी वरसकर, परिषद सदस्य गणेश जेठे, नंदकुमार महाजन, उपाध्यक्ष बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या बैठकीनंतर येथील पत्रकार कक्षात तोरस्कर यांनी पुरस्कार जाहीर केले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष कुळकर्णी (देवगड), युवा पत्रकार पुरस्कार संदेश देसाई (दोडामार्ग), ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष गावडे (चौके मालवण), तर उर्वरित सहा आदर्श पुरस्कारांमध्ये संजय वालावलकर (सिंधुदुर्गनगरी ओरोस), नीलेश जोशी (कुडाळ), सीताराम धुरी (वेंगुर्ले), तुषार सावंत (कणकवली), उज्ज्वल नारकर (वैभववाडी), सचिन रेडकर (सावंतवाडी) आदींची निवड करण्यात आली.