ठाकरे शिवसेनेला अपेक्षित यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे शिवसेनेला अपेक्षित यश
ठाकरे शिवसेनेला अपेक्षित यश

ठाकरे शिवसेनेला अपेक्षित यश

sakal_logo
By

ठाकरे शिवसेनेला अपेक्षित यश
मालवणात दावा ः किनारपट्टीवर भाजपला धक्का
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये उद्भव ठाकरे शिवसेना पक्षाला अपेक्षित यश मिळाले. या निवडणुकीत किनारपट्टी भागात भाजपचा सुपड़ासाफ झाला आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. किनारपट्टीवरील देवबाग, वायरी-भूतनाथ, कोळंब, तळाशील, तारकर्ली या गावांमध्ये भाजपला मतदारांनी नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, मंदार ओरसकर, सेजल परब, सन्मेष परब, यतीन खोत, शिल्पा खोत, कोळंब सरपंच सीया धुरी, विजय नेमळेकर, निखिल नेमळेकर, शशांक धुरी, दादा पाटकर, रेवंडी सरपंच अमोल वस्त, वायरी सरपंच भगवान लुडबे, चंदना प्रभू, तेजस लुडबे, मिनेश चव्हाण, नरेश हुले, दीपा शिंदे, यशवंत गावकर, नंदू गवंडी, सिद्धार्थ जाधव, सुभाष मड्ये तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खोबेरकर म्हणाले, "या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावरील मतदारांचा विश्वास अधोरेखित झाला आहे. कोळंब, रेवंडीसह प्रतिष्ठेच्या वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाले. सगळ्याच ग्रामपंचायतींमध्ये मतदार राजाने आम्हाला कौल दिला. हा कौल आम्हाला मान्य आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त कामे करून आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार राऊत यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवा फडवकाण्यासाठी आणि शिवसेनेला जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. वायरी गावात अखेरच्या क्षणी काही घडामोडी घडल्या; पण मतदार राजाने शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून भगवान लुडबे यांच्यासह पाच सदस्य महाविकास आघाडीचे निवडून दिले. आगामी काळात वायरीसह ज्या ठिकाणी शिवसेनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत, तेथे जास्तीत जास्त विकासकामे केली जातील."
शिवसेनेकडून यावेळी सरपंचपदाची यादी जाहीर करण्यात आली. यात 19 ग्रामपंचायतींवर त्यांनी आपले सरपंच बसल्याचा दावा केला. यात कोळंबमध्ये सीया धुरी, रामगडमध्ये शुभम मठकर, श्रावणमध्ये नम्रता मुद्राळे, चौकेमध्ये गोपाळ चौकेकर, राठीवडेमध्ये दिव्या धुरी, बुधवळे-कुडोपीमध्ये संतोष पानवलकर, कांदळगावमध्ये रणजित परब, रेवंडीमध्ये अमोल वस्त, तळगावमध्ये लता खोत, ओवळीयेमध्ये रंजना पडवळ, वायरीमध्ये भगवान लुडबे, असरोंडीमध्ये अनंत पोईपकर, बांदिवडेमध्ये आशू मयेकर, वायंगणीमध्ये रुपेश पाटकर, असगणीमध्ये साक्षी चव्हाण, साळेलमध्ये रविंद्र साळकर, देवलीमध्ये शामसुंदर वाक्कर, खोटलेमध्ये सुशील परब यांचा समावेश असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
वर्षानुवर्षे राणे समर्थक भाजपच्या ताब्यात असलेल्या कोळंब, कांदळगाव, श्रावण, राठीवडे, बांदिवडे, असगणी, चौके, असरोंडी, बुधवळे-कुडोपी, रेवंडी हे भाजपचे गड आम्ही काबीज केले आहेत. आमदार नाईक यांनी गावागावांत केलेली विकासकामे पाहून भाजपच्या मतदारांनी यावेळी शिवसेनेला साथ दिली. आम्ही परिवर्तनासाठी निवडणुकीत उतरलो आणि त्यात यशही मिळाले. येत्या काही दिवसांत अजूनही अनेक ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व येणार आहे. काही ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये आमच्या विचारांचे सदस्य आले आहेत. उपसरपंच निवडणुकांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असेही खोबरेकर म्हणाले.