झाराप अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाराप अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
झाराप अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

झाराप अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

swt२१२.jpg
७०००१
विधन परमार

झाराप अपघातात जखमी
झालेल्या तरुणाचा मृत्यू
मृत कोलगावचाः मृत्यूशी झुंज अपयशी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ. ता. २१ः झाराप झिरो पाँईट येथे ११ डिसेंबरला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सावंतवाडी येथील विधन रमेश परमार (वय २८, रा. कोलगाव, सावंतवाडी) याचे आज मध्यरात्री गोवा-बांबोळी येथे निधन झाले. तब्बल दहा दिवस त्याने मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
झाराप झिरो पाँईट येथे येथे महामार्गाच्या कडेला थांबलेल्या मोटारीला मागून येणाऱ्या मोटारीने जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघेजण गंभीर, तर तिघे जण किरकोळ जखमी झाले होते.
याबाबत तेंडोली येथील अनंत खानोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचे मित्र कर्नाटक हम्पी येथे इनोव्हा व बेलेना या दोन मोटारींतून ९ ला पर्यटनासाठी गेले होते. त्यानंतर ११ ला दुपारी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी इनोव्हामध्ये त्यांच्यासह त्यांचे मित्र राहुल गोडे (झाराप), विधन परमार (सावंतवाडी), सागर कदम (गोठोस), आरती नांदोसकर (कोचरा), श्वेता हरमलकर (झाराप) हे बसले होते. झाराप येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोटार रस्त्याच्या बाजूला उभी करून पाठीमागील गाडीच्या डिक्कीतील सामान राहुल गोडे, विधन परवार, सागर कदम हे तिघे जण काढत होते. यावेळी कुडाळकडे जाणाऱ्या बोलेरोने इनोव्हाला मागून जोरदार धडक दिली. यात राहुल, विधन, सागर हे जखमी झाले. गाडीमध्ये बसलेली आरती व अनंत हेही जखमी झाले होते.