
गाडगेबाबांचे विचार जनमानसात पोचवा
swt227.jpg
70231
सावंतवाडीः गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित परीट समाजबांधवांसह जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर व पदाधिकारी.
गाडगेबाबांचे विचार जनमानसात पोचवा
दिलीप भालेकरः सावंतवा़डीत पुण्यतिथी उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः परीट समाजबांधवांनी एकसंघ राहून संत गाडगेबाबांचे विचार जनमानसात पोहोचविणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने त्यांची पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले. संत गाडगेबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने खासकीलवाडा येथील वटसावित्री सभागृहात संत गाडगेबाबांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त सकाळी बाजारपेठेतील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर वटसावित्री सभागृहात पुण्यतिथी उत्सव साजरा झाला. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन किरण वाडकर उभयतांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जिल्हा व तालुका दौरा करून लवकरात लवकर कार्यकारिणी पुनर्बांधणी करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी विनायक आजगावकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद घेण्यात आला.
यावेळी परीट समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर मोरजकर, जगन्नाथ वाडकर, मनोहर रेडकर, देवेंद्र होडावडेकर, लक्ष्मीदास आजगावकर, रामा कुडाळकर यांच्यासह दहावीत विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल यश मडवळ याचा सत्कार जिल्हाध्यक्ष भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण बांदेकर, सेक्रेटरी योगेश आरोलकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर, शहराध्यक्ष दयानंद रेडकर, युनियनचे अध्यक्ष प्रदीप भालेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर राणी जानकीबाई सुतिकागृह व कुटीर रुग्णालयात फळे व प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी भजन व विविध कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी लक्ष्मण बांदेकर, योगेश आरोलकर, जितेंद्र मोरजकर, रितेश चव्हाण, सुरेंद्र कासकर, भगवान वाडकर, प्रकाश लोकळे, किरण वाडकर, दिनेश होडावडेकर, संतोष मडवळ, संदीप बांदेकर, शशिकांत परीट, अनिल होडावडेकर, सुरेश पन्हाळकर, प्रदीप भालेकर, प्रवीण मोरजकर, दयानंद रेडकर, वरुण भालेकर, मनोहर रेडकर, ज्ञानेश्वर भालेकर, देवेंद्र होडावडेकर, सुनील होडावडेकर यांच्यासह महिला भगिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रदीप भालेकर यांनी, आभार जितेंद्र मोरजकर यांनी मानले.