
बिरसा फायटर्सने जिल्ह्यात सरपंचपदाचे खाते खोलले
rat२२१६.txt
( टुडे पान २ साठीमेन)
फोटो ओळी
-rat२२p४.jpg -
७०२४०
चिपळूण ः तालुक्यातील कळकवणे-दादर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आलेल्या सविता निकम यांचा बिरसा फायटर्सतर्फे सत्कार करण्यात आला.
-----------
बिरसा फायटर्सने जिल्ह्यात सरपंचपदाचे खोलले खाते
सविता निकम ; कळकवणे-दादर ग्रामपंचायतीत विजयी
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २२ ः बिरसा फायटर्स या आदिवासी समाजाच्या सामाजिक संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा महिला प्रतिनिधी सविता निकम या चिपळूण तालुक्यातील कळकवणे-दादर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. नवनिर्वाचित सरपंच सविता रमेश निकम यांचा बिरसा फायटर्स चिपळूण शाखेकडून सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात एकमेव सरपंच निवडून बिरसा फायटर्सने रत्नागिरीतील ग्रामीण राजकारणात आपले खाते खोलले आहे.
या वेळी बिरसा फायटर्सचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत निकम, चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश पवार, महिला प्रतिनिधी मंदा निकम, सान्वी पवारसह काही आदिवासी बांधव उपस्थित होते. राज्यात एकूण १० सरपंच निवडून आणत बिरसा फायटर्सने ग्रामीण राजकारणात आपले यश संपादन केले आहे. तिसऱ्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिरसा फायटर्स संघटनेचे गोंदिया जिल्ह्यात ८, धुळे जिल्ह्यात १ व रत्नागिरी जिल्ह्यात १ असे एकूण १० सरपंच उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. यात धुळे जिल्हा सल्लागार दिलीप पावरा हे शिरपूर तालुक्यातील वरझडी गावाचे सरपंच म्हणून निवडून आले, तर गोंदिया जिल्ह्यात साकोली, तिरोडा तालुक्यात ८ उमेदवार निवडून आले आहेत. दापोलीत बिरसा फायटर्सचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार यांनी कुडावळे ग्रामपंचायतीतून निवडणूक लढवली. त्यांना १२५ मते मिळाली असून ते पराभूत झाले आहेत.
बिसरा फायटर्सचा राजकारणात प्रवेश...
ग्रामपंचायत निवडणुकीत बिरसा फायटर्सचे पहिल्या टप्प्यात १३, दुसऱ्या टप्प्यात २, तिसऱ्या टप्प्यात १० असे एकूण २५ सरपंच उमेदवार विजयी झाले आहेत. बिरसा फायटर्स या नव्या संघटनेने ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणून यश संपादन केले आहे. अशा प्रकारे राज्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात बिरसा फायटर्सने प्रवेश केला आहे.