शेतकऱ्यांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना संधी
शेतकऱ्यांना संधी

शेतकऱ्यांना संधी

sakal_logo
By

rat२२१८. txt

(टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

सिल्लोड महोत्सवात शेतकऱ्यांना संधी

रत्नागिरी ः औरंगाबाद येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत राजस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात राज्यभरातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन व कृषी विद्यापीठामार्फत विविध विषयांवर तांत्रिक चर्चासत्रे, विविध प्रात्यक्षिके, शासनाच्या विविध योजनांचा सादरिकरण यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आदींचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, कृषी विद्यापीठे व महामंडळे यांचा विशेष सहभाग असणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रगतशील शेतकरी, महिला बचतगट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, विविध कृषी प्रक्रिया उद्योजक यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुंनदा कुऱ्हाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क साधावा.
-------
सेवानिवृत्तांसाठी ३० डिसेंबरला डाक अदालत

रत्नागिरी ः येथील डाकघर अधीक्षक कार्यालयात ३० डिसेंबरला दुपारी ११ वाजता जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. सेवानिवृत्त डाक कर्माचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एक तक्रार अर्ज करावा व तपशीलासह केलेला असावा, उदा तारीख व ज्या अधिकाऱ्याने मुळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव हुद्दा इत्यादी पेन्शन अदालतमध्ये नितीगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इत्यादी आणि नीती प्रकरणाशी संबंधित तक्रारीचा विचार करण्यात येणार नाही. आपला अर्ज एन. टी. कुरळपकर, डाकघर अधीक्षक विभागीय कार्याल, रत्नागिरी यांच्या नावे २६ डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा, असे अधीक्षक डाकघर रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांनी कळविले आहे.
---
नेहरु युवा केंद्रातर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन

रत्नागिरी ः नेहरु युवा केंद्राशी सलग्न असलेल्या जिल्ह्यातील युवक मंडळांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास इच्छूक असलतील तर नेहरु युवा केंद्र कार्यालयाशी संपर्क करावा या स्पर्धेमध्ये पाच क्रिडा प्रकारांचे आयोजन करायचे आहे. ती वैयक्तीक स्पर्धा दोन ग्रुप स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ग्रुप स्पर्धेमध्ये फुटबॉल, कबड्डी, हॉकी, हॅण्डबॉल, बास्केट बॉल, खो-खो, व्हॉलिबॉल टग ऑफ वार यापैकी क्रीडा प्रकारचे आयोजन करायचे आहे. वैयक्तीक स्पर्धेत अॅप्लेटीक्स, रेसलिंग, आर्चरी, स्विमिंग, जिमनॅस्टिक, टेबल टेनिस, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, तायक्वॉंदो, बॉक्सिंग, ज्युदो, बॅडमिंटन यापैकी तीन क्रीडा प्रकाराचे आयोजन करायचे आहे. नेहरु युवा केंद्राशी संलग्न असलेल्या युवक मंडळांनी क्रीडा साहित्याचा अर्ज भरुन द्यावयाचा आहे. रत्नागिरी घ. नं. ७११ ई, शंकेश्वर नगर ई-विंग बिल्डींगच्या समोर, गांधी कंपाऊंड, आरोग्य मंदिर, रत्नागिरी या कार्यालयात अर्ज द्यावा असे कळविले आहे.
---------
आकाश चव्हाण भारतीय कबड्डी संघात

खेड ः तालुक्यातील कर्टेल येथील आकाश चव्हाण याची थायलंड येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी तो बडोदा येथून रवाना झाला. आजवर त्याने अनेक कबड्डीपटूही तयार केले असून राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. त्याचे वडीलदेखील उत्कृष्ट कबड्डीपटू असून वडोदरा ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आकाश याची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल कर्टेल ग्रामस्थ व मुंबईतील शिवशक्ती सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले.
-------
तायक्व़ॉदो स्पर्धेत अमेय सावंतला कास्य

रत्नागिरी : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मारुती मंदिर येथील एसआरके तायक्वांदो क्लबचा खेळाडू अमेय अमोल सावंत याने ८७ किलो खालील वजनी गटात कांस्यपदक मिळवले. वरिष्ठ अर्थात सिनियर गटाची ही पहिलीच स्पर्धा असून यापूर्वी त्याने सबज्युनिअर आणि ज्युनिअर गटात राज्य राष्ट्रीय पातळीवर रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याला आजवर एसआरके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष, प्रमुख प्रशिक्षक व तालुका सचिव शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल संघटनेचे महासचिव मिलिंद पाठारे, तांत्रिक कमिटी अध्यक्ष प्रवीण बोरसे, उपाध्यक्ष अविनाश बारगिजे, सदस्य वेंकटेश कररा, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तालुकाध्यक्ष राम कररा, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत माकवाना, सदस्य शीतल खामकर, प्रदीप कीर यांनी शुभेच्छा दिल्या.
------
विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

साखरपा ः रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील प्राथमिक शाळा नालेवठारमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना कुणबी समाजक्रांती संघटनेच्यावतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी कुणबी समाजक्रांती संघटना दरवर्षी कार्यक्रम राबवत असते. या वेळी पूजा काकड यांनी वह्या उपलब्ध करून दिल्या तर संघटनेचे सदस्य सिद्धेश धुळप यांनी शाळेला १ हजार १ रुपये देणगी दिली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका इंद्रजा जोगल यांनी संघटनेचे कौतुक केले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सलील डाफळे यांच्यासाहित संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

चिपळुणात १० जानेवारीपासून कीर्तनमाला

चिपळूण ः श्री स्वामी चैतन्य परिवार चिपळूणतर्फे १० ते १४ जानेवारीदरम्यान सायंकाळी ६ वा. शहरातील श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूणअंतर्गत (कै.) बापू बाबाजी सागांवकर मैदान, जुना कालभैरव प्रांगण येथे भव्य कीर्तनमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तनमालेचे हे सातवे वर्ष आहे. त्यानुसार यावर्षी राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारूदत्तबुवा आफळे हे शिवचरित्र या विषयावर कीर्तनातून प्रबोधन करणार आहेत.