
शिरसोलीची धनश्री जाधव जाणार अमेरिकेत
rat२२१२.txt
बातमी क्र. १२ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat२२p८.jpg-
७०२३६
दापोली ः अमेरिकेला जाणारी विद्यार्थिनी धनश्री जाधवचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव.
---
शिरसोलीची ‘धनश्री’ जाणार अमेरिकेत
सकाळ वृत्तसेवा ः
गावतळे, ता. २२ ः दापोली तालुक्यातील शिरसोली शाळेची सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी धनश्री संजय जाधव ही नासासाठी तर जालगावची तनिष्का जयंत बोधगावकर आणि मळे शाळेतील सुयश सुनील गोसावी यांनी इस्त्रो भरारीसाठी चार चाळणी चाचणीमधून अंतिम विजेतेपद पटकावले.
शिरसोली येथे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, उत्तम राठोड, पालगड शिक्षण विस्तार अधिकारी सुनील सावंत, पद्मन लहांगे यांनी शिरसोली शाळेत मार्गदर्शक शिक्षक व धनश्री यांचा सत्कार केला. जिथे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही. अशा शिरसोली गावच्या मराठी शाळेतील विद्यार्थीनीला अमेरिका नासाला जाण्याची संधी मिळाली. तालुक्याची गुणवत्ता कायम ठेवत अगदी केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत झालेल्या वस्तुनिष्ठ चाळणी परीक्षेत शिरसोली शाळेचे यश हे भूषणावह असल्याचे उत्तम राठोड यांनी सांगितले. गावाच्या भिंतीवर सुवर्णाक्षरांनी कोरावं असं नाव शिरसोलीची धनश्री होय, असे पद्मन लहांगे यांनी गौरवोद्गार व्यक्त केले. अश्रुंची झाली फुले असा शब्दगौरव विस्तार अधिकारी सुनील सावंत यांनी केला. आपली नासावारीसाठी झालेली निवड सार्थ ठरवू, असे धनश्रीने सांगितले.