
रत्नागिरी-जिल्ह्यात श्रमदानातून बांधले 1 हजार 167 बंधारे
फोटो ओळी
-rat२२p९.jpg- KOP२२L७०२५९ मुर्शी येथे बांधण्यात आलेला बंधारा.
-----
जिल्ह्यात श्रमदानातून बांधले १,१६७ बंधारे
पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम ; लाखोंची बचत
रत्नागिरी, ता. २२ ः पाऊस लांबल्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम प्रत्यक्षात राबविण्यास उशीर झाला. तरीही डिसेंबर अखेरीस रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार १६७ बंधारे श्रमदानातून उभारण्यात यश आले आहे. त्यामुळे सिंचनासह विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने १० बंधारे बांधण्याचे लक्ष्य जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. एप्रिलपासून पाणी टंचाईला सुरुवात होते. त्यावर उपाय म्हणून गावागावातील छोट्या नद्या, नाले यांचे पाणी अडवून ते जिरवले तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पाणी अडवण्यासाठी तात्पुरते कच्चे, वनराई व विजय बंधारे बांधल्यास लाखो लीटर पाणी साठवता येते. तसेच टंचाई काळात पाण्याचे दुर्भिक्षही टाळता येते. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. यंदाही त्यादृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन केले. त्यात यश आले असून आतापर्यंत मोठ्याप्रमाणात बंधारे बांधण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून आतापर्यंत १ हजार १६७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात २४९ वनराई, ३४४ विजय तर ५७४ कच्च्या बंधाऱ्यांचा समावेश आहे. यासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतींनी लोकसहभागामधून जमा केले आहे. श्रमदानातून हे बंधारे बांधले जात असल्याने लाखो रुपयांची बचत झाली आहे. या बंधाऱ्यांमध्ये लाखो लिटर पाणी साठले आहे.
-----
चौकट
जिल्ह्यातील चित्र
* तालुका* बंधारे
* मंडणगड *४३
* दापोली* २५१
* खेड * ८३
* गुहागर * १०२
* चिपळू* २२२
* संगमेश्वर*७९
* रत्नागिरी *१२४
* लांजा * ७२
* राजापूर *१९१