
रत्नागिरी- जैन समाजाचा मूकमोर्चा
फोटो ओळी
rat22p6-KOP22L70293 रत्नागिरी : विविध मागण्यांसाठी मोर्चा काढताना रत्नागिरीतील सकल जैन समाजबांधव.
-rat२२p७.jpg- KOP22L70283 रत्नागिरी : निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना निवेदन देताना सकल जैन समाजाचे अध्यक्ष, पदाधिकारी.
------------
धर्मावर आक्रमणामुळे जैन समाज एकवटला
रत्नागिरीत मोर्चा ; दुकाने बंद ठेवत निषेध फलक, काळ्या फिती
रत्नागिरी, ता. २२ : पालिताणा (सौराष्ट्र, गुजरात) येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची विटंबना आणि झारखंड येथे कल्याणभूमीवर पर्यटनस्थळ करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात येथील सकल जैन समाजाने शहरात मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. जैन समाजाची दुकाने अर्धवेळ बंद ठेवण्यात आली. धर्मावर आक्रमण होत असल्याने समाज एकवटला असून सरकार, प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी, असा इशारा देण्यात आला.
श्री जैन श्वेतांबरमूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी संघ आणि श्री दिगंबर जैन मंडळातर्फे मोर्चा काढला. यामध्ये साडेतीनशेहून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले. जैन मंदिर, राम आळी, गोखले नाका, मारुती आळी, एसटी स्टॅंड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चामध्ये निषेधाचे फलक दाखवण्यात आले तसेच हाताला काळ्या फिती लावल्या होत्या. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे निवेदन सादर केले.
पालिताणा येथील शत्रुंजय पर्वत जैन समाजाचा आहे. येथे जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येन येतात. परंतु समाजकंटकांनी हा पर्वत अवैधपणे ताब्यात घेतला जात असून भाविक, साधूंना त्रास दिला जात आहे. तसेच गुरु मंदिरातील पादुकांची नासधूस करण्यात आली असून सीसीटीव्हीमध्ये हे रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
मोर्चानंतर जैन भवनामध्ये पत्रकार परिषद झाली. त्या वेळी श्री जैन श्वेतांबरमूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष भरत जैन, श्री वर्धमान स्थानकवासी संघाचे अध्यक्ष महेंद्र गुंदेचा व श्री दिगंबर जैन मंडळाचे अध्यक्ष अजित शिराळकर प्रमुख उपस्थित होते. तसेच दिलीप संघवी, मनिष जैन, अरविंद जैन, अशोक मणियार, मुकेश गुंदेचा, नीलेश शाह, भैरू ओसवाल, सूर्यकांत कटारिया, रिंकेश जैन, जयंतीलाल ओसवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट १
जैन समाज मांडणार बाजू
झारखंडमधील सम्मेद शिखर तीर्थ येथे २० तीर्थंकरांची कल्याणभूमी आहे. या ठिकाणी झारखंड राज्य सरकारने पर्यटनस्थळ विकसित करण्याची घोषणा केली आहे. याला भारतातील जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यासंदर्भात पुढील महिन्यात जैन समाजाला आपली बाजू मांडण्याकरिता बोलावण्यात आले आहे. त्यामुळे हे धर्मस्थळच राहिल, पर्यटनस्थळ होणार नाही, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.