पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

कोंडगावमध्ये गाडगेबाबा पुण्यतिथी
पावस ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील संत गाडगेबाबा नगर येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी व कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या. संगीत खुर्चीत लहान गटात प्रजोल पाटील व श्रेयस पाटील, मोठ्या गटात नेत्रा जाधव, सुवर्णा पाटेकर, लिंबू चमचा लहान गटात वर्धन कोपार्डे, गणेश पाटील, मोठ्या गटात स्वरूपा कोपार्डे, संध्या गांगण, मिनाक्षी मोरे, बादलीत बॉल टाकणे लहान गटात गणेश पाटील, धनंजय जाधव, प्रसाद गांगण, तर मोठ्या गटात पुनम मांडवकर व वर्षा तरंगे विजयी झाले. विजेत्या स्पर्धकांना सुवर्णा पाटेकर व विनायक कोपार्डे यांनी बक्षिसे दिली. सुयश वाकसे, श्रेयस कोपार्डे, राज कदम, पायल पाटील, श्रावणी गांगण, मिनाक्षी मोरे, लावण्य मोरे, बापू शेट्ये, संतोष पोटफोडे, आबा सावंत, मारुती शिंदे, बाळू जामसांडेकर यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

कोसुंबचा जुगाई संघ
भंडारी चषकाचा मानकरी
पावस ः देवरूख-भंडारवाडीतील एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळातर्फे आयोजित तालुकास्तरीय मॅटवरील जय भंडारी चषक कबड्डी स्पर्धेत जुगाई कोसुंब संघाने सोळजाई संघावर मात करून विजेतेपद पटकावले. तृतीय विजेता नीळकंटेश्वर वरचीआळी देवरुख, चतुर्थ विजेता हिंदवी देवरुख संघाला रोख रक्कम व चषक बक्षीस देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू कौस्तुभ जाधव (जुगाई) याला होमथिएटर, उत्कृष्ट चढाई- अविष्कार पालकर (सोळजाई) याला मोबाईल, उत्कृष्ट पकड- सौरभ लांबे (सोळजाई) याला मोबाईल देण्यात आला. अंतिम सामन्याचा सामनावीर कौस्तुभ जाधव (जुगाई) याला मनगटी घड्याळ देऊन गौरवण्यात आले.

थ्रो बॉल स्पर्धेत पावस प्रशालेचे वर्चस्व
पावस ः जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल क्रीडास्पर्धेत १४ वर्षाखालील मुली वयोगटामध्ये पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरने विजेतेपद प्राप्त केले. या संघामध्ये कर्णधार तन्वी गोरे, अनुजा आग्रे, कांदबरी झोरे, प्राप्ती शेळके, मानसी मोरे, वैष्णवी झोरे, सृष्टी नैकर, श्रमिका शिंदे, श्लोका मोरे, सानिका वारीशे, समृद्धी सटये, अनिषा वालम या खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १९ वर्ष वयोगटातील मुलींचा संघ जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. यामध्ये कर्णधार अपेक्षा नैकर, ऐश्वर्या कालकर, वैशाली नमसले, मनीषा रावल, ऐश्वर्या तरळ, तीर्था चव्हाण, रिना शेडगे, संयुक्ता वारीशे, सानिया नैकर, श्रुती तरळ, सानिया म्हादये, तेजस्वी वजरेकर खेंचा समावेश होता. त्यांना क्रीडाशिक्षक सुनील अलकुटे, सचिन कडवेकर, समिधा नार्वेकर, सौरभ चव्हाण, अरविंद वाघचवरे, ओंकारप्रसादे यांचे मार्गदर्शन लाभले. संतोष सामंत, माधव पालकर, मुख्याध्यापक बाबासाहेब माने, संस्था सचिव हरीश सामंत आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.