नासाला जाणाऱ्या भूषण धावडेचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नासाला जाणाऱ्या भूषण धावडेचा सत्कार
नासाला जाणाऱ्या भूषण धावडेचा सत्कार

नासाला जाणाऱ्या भूषण धावडेचा सत्कार

sakal_logo
By

rat228.txt

(टुडे पान 2 साठी)

फोटो ओळी
-rat22p12.jpg-
70270
राजापूर ः भूषण धावडे याचा सत्कार करताना सरपंच वैष्णवी कुळ्ये.
--------------

नासाला जाणाऱ्या भूषण धावडेचा सत्कार

जिल्हा परिषदेचा उपक्रम ; पांगरे बुद्रुक शाळेचा विद्यार्थी

राजापूर, ता. 22 ः जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या गगनभरारी उपक्रमासाठी तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील भूषण चंद्रकांत धावडे याची निवड झाली आहे. त्यामुळे भूषण याला आता अमेरीकेतील नासा आणि भारतातील इस्त्रो या संस्थांना भेटी देण्याची आणि तेथील कामकाज समजून घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
भूषणच्या झालेल्या या निवडीबद्दल त्याचे सरपंच वैष्णवी कुळ्ये, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष वैशाली सावंत, केंद्रप्रमुख सुनrल शिवगण यांच्यासह पांगरे बुद्रुक येथील स्थानिक आणि मुंबईतील ग्रामस्थांसह सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे. भूषण याला मार्गदर्शन करणाऱ्‍या प्रशाळेच्या मुख्याध्यापक प्रभुदेसाई, शिक्षक नलावडे, श्री. धुरी यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी तालुक्यातून जास्तीत जास्त हुशार आणि प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची निवड व्हावी म्हणून गटशिक्षणाधिकारी सखाराम कडून यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने मेहनत घेतली होती. त्यातून जिल्हास्तरीय परिक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पांगरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील भूषण याचा समावेश आहे.
दरम्यान, गगनभरारी उपक्रमासाठी बीट, केंद्रस्तरीय झालेल्या परीक्षेसाठी पांगरे येथील शाळेतून भूषण चंद्रकांत धावडे, शमिका जनार्दन तोरस्कर, महादेव प्रकाश कुळये, पार्थ संतोष तोरस्कर यांनीही परीक्षा दिल्या होत्या. त्यांनीही त्या-त्या स्तरावर चांगले यश मिळविले होते. मात्र या सार्‍यामधून भूषण याने जिल्हास्तरावर धडक देवून त्याची जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये भूषण याचा समावेश झाला आहे.