चिपळूण ः''जलजीवन मिशन''मधून 87 लाख 58 हजारांची योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः''जलजीवन मिशन''मधून 87 लाख 58 हजारांची योजना
चिपळूण ः''जलजीवन मिशन''मधून 87 लाख 58 हजारांची योजना

चिपळूण ः''जलजीवन मिशन''मधून 87 लाख 58 हजारांची योजना

sakal_logo
By

फोटो ओळी
-ratchl२२१.jpg- चिपळूण ः पाणी योजनेचे भूमिपूजन करताना सरपंच सुनील वाजे.

---------------
''जलजीवन मिशन''मधून
८७.५८लाखांची योजना
मालघरमध्ये भूमिपूजन ; खासदार सुनील तटकरेंचे साह्य
चिपळूण, ता. २२ ः तालुक्यातील मालघर गावातील लोकांना मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी ''जलजीवन मिशन''मधून ८७ लाख ५८ हजार ४९२ रूपयाची पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन गुरुवारी (ता. २२) बहुसंख्य ग्रामस्थांच्या साक्षीने सरपंच सुनील वाजे यांच्या हस्ते करण्यात आले.
मालघरमध्ये सर्वांगीण विकास कामे करताना सरपंच सुनील वाजे यांनी ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले. गावची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या लक्षात घेतल्यास प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरविणे आणि त्याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत होती. यातून प्रत्येकाला पाणी मिळेल याची काळजी ते व सहकारी घेत होते. १९९५ मधील ''महाराष्ट्र जिवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना ही पूर्णपणे निकामी व जीर्ण झाल्याने अशा परिस्थिमध्ये गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे जिकीरीचे होते. सद्य परिस्थितीत गावच्या वाढलेली लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची वाढलेली गरज व मागणी पाहता ग्रामपंचायतीला नवीन व जास्त क्षमतेची नळ पाणीपुरवठा योजना गावामध्ये राबविणे क्रमप्राप्त झाले होते. याची दखल घेत गावाच्या मूलभूत सुविधेसाठी सरपंच सुनील वाजे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत माजी सरपंच राजेश वाजे यांच्या सहकार्याने खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजना सप्टेंबरमध्ये मंजूर करून घेतली. या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम सरपंच वाजे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी सरपंच राजेश वाजे, साक्षी लटके, उपसरपंच विजया मोरे, गंगाराम महाडिक, अरुण खेडेकर, मानसी वाजे, शामल वाजे, ग्रामसेविका रोहीणी सकपाळ, पाणीपुरवठा अधिकारी जोशी, तटकरे, अजय वाजे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.