पालिकेचे घड्याळ सुरू कधी होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेचे घड्याळ सुरू कधी होणार?
पालिकेचे घड्याळ सुरू कधी होणार?

पालिकेचे घड्याळ सुरू कधी होणार?

sakal_logo
By

swt2216.jpg
70282
सावंतवाडीः येथील पालिकेचे बंद अवस्थेतील घड्याळ.

पालिकेचे घड्याळ
सुरू कधी होणार?
सावंतवाडीत प्रकारः ‘सामाजिक बांधिलकी’कडून प्रश्न उपस्थित
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ : येथील पालिकेच्या इमारतीवर असलेले घड्याळ अनेक दिवस बंद आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे. याबाबत ''सामाजिक बांधिलकी''चे अध्यक्ष रवी जाधव यांनी बंद घड्याळाचा फोटो माध्यमांना पाठवून ''पालिकेच्या घड्याळात बारा कधी वाजणार?'' असा सवाल प्रसिध्दी पत्रकातून आहे.
पत्रकात नमूद केले आहे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सावंतवाडी पालिका मोती तलावाच्या काठी असल्याने पर्यटनासाठी एक खास आकर्षणाचा भाग ठरला आहे. या शहरामध्ये दररोज येणारा पर्यटक, आजूबाजूच्या गावांतून येणारे नागरिक तसेच शहरातील नागरिकांचा सर्वप्रथम लक्ष पालिकेच्या घड्याळाकडे जाते; मात्र कित्येक दिवस बंद असलेल्या घड्याळामुळे जनतेची गैरसोय होत आहे. बाजारपेठेतील तारा हॉटेल, आरपीडी कॉलेज गतिरोधकांकडील व गांधी चौक आनंद भुवन हॉटेल समोरील रस्त्यावर पडलेले खड्डे आदी काही बाबी ''सामाजिक बांधिलकी''ने पालिकेच्या निदर्शनास आणून देत याबाबत योग्य कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली आहे.
...................