हातिवले, ओसरगाव टोल माफ करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातिवले, ओसरगाव टोल माफ करा
हातिवले, ओसरगाव टोल माफ करा

हातिवले, ओसरगाव टोल माफ करा

sakal_logo
By

swt2218.jpg
70288
दिल्लीः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना खासदार विनायक राऊत. सोबत खासदार अरविंद सावंत.

हातिवले, ओसरगाव टोल माफ करा
विनायक राऊतः केंद्रीय मंत्री गडकरींना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ः मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले व ओसरगाव येथील टोल प्लाझा सिंधुदुर्गातील सर्व वाहनांसाठी ''टोल फ्री'' करावा. हातिवले टोल फ्री करताना त्यात राजापूर तालुक्याचाही समावेश करावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले व सिंधुदुर्गातील ओसरगाव येथे टोल वसुली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. राजापूर (जि. रत्नागिरी) आणि खारेपाटण (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान स्थानिक गावकरी व शेतकरी, दुकानदार आणि छोटे व्यावसायिक रोज कामासाठी आणि शेतीसाठी प्रवास करतात. ओसरगाव टोल नाका जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. ओसरगाव टोल नाक्यापासून मुख्यालय सिंधुदुर्गनगरी सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या जिल्ह्यातील उत्तर तालुक्यांतील स्थानिक लोक मोठ्या संख्येने दररोज जिल्ह्यात येतात. मुख्यालय तसेच सिंधुदुर्गच्या दक्षिणेकडील कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग या चार तालुक्यांतील जास्तीत जास्त लोक कामानिमित्त कणकवली ते देवगड दरम्यान दररोज ये-जा करतात. या दोन टोल टॅक्स नाक्यांवर प्रस्तावित वसुलीमुळे स्थानिक रहिवाशांना दररोज मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील राजापूर तालुका आणि सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका जिल्ह्यातील सर्व वाहनांसाठी टोल फ्री करावा, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते
...............