हॉस्पिटलचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉस्पिटलचे उद्घाटन
हॉस्पिटलचे उद्घाटन

हॉस्पिटलचे उद्घाटन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p४.jpg ः
KOP22L70305
राजापूर ः अ‍ॅडव्हान्स लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सेंटरचा आरंभ करताना आमदार डॉ. राजन साळवी. या वेळी उपस्थित महेश नाईक, डॉ. खलिफे, डॉ. राम मेस्त्री आदी.
--

वृंदावन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सेंटरचे उदघाटन

राजापूर ः डॉ. राम मेस्त्री यांच्या वृंदावन हॉस्पिटल येथील अ‍ॅडव्हान्स लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सेंटरचा आरंभ आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते झाले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असे आणि ते खूप खर्चिकही असते. डॉ. मेस्त्री यांनी अशा प्रकारचे अॅडव्हान्स तंत्रज्ञान राजापूर येथे उपलब्ध करून राजापूर आणि कोकणवासियांसाठी आरोग्यविषयक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी रत्नागिरी येथील गोगटे कॉलेजचे महेश नाईक, डॉ. मेस्त्री, शिवसेना शहरप्रमुख संजय पवार, डॉ. खलिफे, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, डॉ. अजित जोशी, डॉ. सुयोग परांजपे, डॉ. सागर पाटील, माजी नगरसेवक अभय मेळेकर, विनय गुरव आदींसह शिवसेना पदाधिकारी, डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---