मरीनर दिलीप भाटकर साधणार विद्य़ार्थ्यांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मरीनर दिलीप भाटकर साधणार विद्य़ार्थ्यांशी संवाद
मरीनर दिलीप भाटकर साधणार विद्य़ार्थ्यांशी संवाद

मरीनर दिलीप भाटकर साधणार विद्य़ार्थ्यांशी संवाद

sakal_logo
By

-rat१२p१६.jpg -मरीनर दिलीप भाटकरKOP२२L७०३००
----------
मरीनर दिलीप भाटकर
साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
शिप ब्रेकिंग प्रकल्पाचे शिल्पकार ; अलोरे हायस्कूलचा सुवर्णमहोत्सव
चिपळूण, ता. २२ ः तालुक्यातील अलोरे येथील मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ साजरा करणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २८ डिसेंबरला सकाळी १० ते १ वा. या वेळेत ‘मरीनर’ दिलीप भाटकर उपस्थित राहणार असून शाळा संकुलात चारूशिला मुकुंद जोशी स्मृतीविचार मंचावर भाटकर संवाद साधणार आहेत.
दिलीप भाटकर भारतातील पहिल्या सुक्या गोदीचे यशस्वी जलावतरण करणारे आणि पश्चिम भारतातील दुसरा ‘शीप ब्रेकींग प्रकल्प’ उभारणारे मरिनर आहेत. नौकानयन क्षेत्रात जागतिक पातळीवर वावर असणारे भाटकर हे मरीन सिंडिकेट प्रा. लि. रत्नागिरीचे संचालक आहेत.
पाचवीतील विद्यार्थ्यांशी प्रज्ञा नरवणकर, सातवी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांशी आनंद सावंत आणि डॉ. शिल्पा कुलकर्णी संवाद साधतील. स्वागतयात्रा अंतर्गत शाळेच्या शिशुविहार व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली वृक्षदिंडी (शेतकरी) निघणार आहे. वृक्षदिंडी ही शाळेच्या सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना होईल. बालगोकुलम अंतर्गत लगोरी, पाच खड्यांचे खेळ, हुतूतू, काचकवड्या, आबाधुबी, गोट्या, लंगडी, सोनसाखळी, विटी-दांडू आदी पारंपरिक मातीतील खेळ खेळले जातील. वैभव देवरूखकर हे शरीरसौष्ठव प्रात्यक्षिक सादर करतील. यानंतर तेथे कृष्ण, सुदामा आणि त्यांचे सवंगडी पोषाखात पोह्यांचा प्रसाद वाटप करतील. याचवेळी शाळेचे आठवी ते दहावी, अकरावी-बारावीतील काही विद्यार्थी स्मृतिस्थळाजवळ वृक्षारोपण करणार आहेत.

सुवर्ण महोत्सवांतर्गत १९७२ ते ९२ या कालावधीत शाळा ज्या विविध इमारतींमध्ये भरत होती त्याठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला जाणार आहे. या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सायं. ४ ते ७ वाजता करमणूक कार्यक्रम अंतर्गत शाळेतील ५वी ते ७वी व ११वी, १२वी कला-वाणिज्य वर्गाचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील.